Saturday, May 4, 2024
Homeजळगाववैशाली हिंगे यांच्या बदलीला स्थगिती देण्यास मॅटचा नकार

वैशाली हिंगे यांच्या बदलीला स्थगिती देण्यास मॅटचा नकार

जळगाव – Jalgaon :

येथील तहसीलदार वैशाली हिंगे यांची नंदुरबार येथे नुकत्याच बदली झाली होती. मात्र, त्यांनी मॅटमध्ये धाव घेऊन बदली रद्द करण्याची मागणी केली होती.

- Advertisement -

मात्र, त्यांच्या झालेल्या बदलीला स्थगिती देण्यास मॅटने नकार दिला आहे. जळगावच्या तहसीलदार वैशाली हिंगे यांची नुकतीच नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्पात उपसंचालक या पदावर बदली झालेली आहे.

बदली विहित कालावधीच्या आधी झाली असल्यामुळे रद्द करण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार वैशाली हिंगे यांनी केली होती.

या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र सेवा प्राधिकरण अर्थात मॅटकडे धाव घेतली होती. हिंगे यांनी मॅटमध्ये अपील दाखल केल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी मॅटमध्ये त्रयस्थ अर्जदार याप्रकारे अर्ज दाखल करत वैशाली हिंगे यांची बदली रद्द करण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती.

त्यावर आज महाराष्ट्र सेवा प्राधिकरणमध्ये सुनावणी होऊन मॅटने दीपककुमार गुप्ता यांचा त्रयस्थ अर्जदार म्हणून अर्ज निकाली काढण्यात आला आणि वैशाली हिंगे यांच्या बदलीस स्थगिती देण्यास नकार देण्यात आलेला आहे.

त्यामुळे हिंगे यांना तूर्तास कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान, तहसीलदार वैशाली हिंगे यांनी मॅटमध्ये दाखल केलेल्या अर्जावर आता पुढील सुनावणी आठवड्याभरानंतर होणार आहे.

आता तहसीलदार वैशाली हिंगे या बदली झालेल्या ठिकाणी रुजू होणार की आणखी कोणती भूमिका घेणार याविषयी तहसील कार्यालयाच्या परिसरात चर्चेला उधान आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या