Wednesday, May 21, 2025
Homeनगरमातुलठाणचे पिण्याचे पाणी दूषित

मातुलठाणचे पिण्याचे पाणी दूषित

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील पाणी पुरवठा करणार्‍या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य राहिले नसुन पाण्याचा उग्रवास येत आहे.

तसेच हेच पाणी नाईलाजास्तव नागरिकांना प्यावे लागत असल्याने ग्रामस्थाना पोटदुखीसह जुलाब अशा आजाराने त्रस्त झाले आहे.पंधरा दिवसापूर्वी ग्रामसेवकांना पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावे, असे काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष सतिश बोर्डे यांनी सूचित केले होते, मात्र तरीही संबधितानी गावाच्या आरोग्याची दखल घेतली नसुन वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी काँग्रेस कमिटीचे तालुका उपाध्यक्ष सतिश बोर्डे यांनी केली आहे.

या पिण्याच्या पाण्यासंदर्भांत वेळोवेळी चौकशी केली, परंतु पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याचा रिपोर्ट आला नाही असे उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली असून वास्तविक ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न असताना देखील अधिकारी व ग्रामपंचायतने दखल घेतली नसल्याने याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांना ही दिली असुन गावचे ग्रामसेवक यांना विचारणा केली असता रिपोर्ट आलेला नाही असे उत्तर मिळाले असल्याचे श्री. बोर्डे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मोहन शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून माहिती घेतली असता पाणी तपासणी चा अहवाल येण्यास इतका उशिर लागत नसल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना या गंभीर प्रश्नांची माहिती दिली त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटात चक्र फिरल्यानंतर काही वेळेतच रिपोर्ट देण्यात आला असुन हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे विस्तार अधिकारी यांनी सांगितले असल्याची माहिती सतिश बोर्डे यांनी दिली.

ग्रामस्थांच्या आरोग्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीची असुन ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ पाण्याचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील खाजगी लॅब मध्ये तपासणीसाठी न्यावे, प्रशासनाने या जीवन मरणाच्या प्रश्नावर लक्ष घालुन काही आजार उदभवण्यापूर्वीच हा प्रश्न मार्गी लावावा,अन्यथा आम्हाला आंदोलनाचे हत्यार हाती घ्यावे लागण्याचा इशारा देखील तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सतिश बोर्ड यांनी दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २१ मे २०२५ – विज्ञानयात्री…

0
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे कार्यकर्तृत्व समाज कधीही विसरणार नाही. समाजाला सतत विज्ञानाधिष्टीत विचार करण्यास त्यांनी प्रवृत्त केले. ‘कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी’ साठी डॉ....