नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa
नेवासा येथील परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक संतोष खाडे यांच्या पोलीस पथकाने सुगंधीत तंबाखू विक्री करणार्या 12 ठिकाणी छापे टाकून पावणेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत माहिती अशी की, 13 एप्रिल रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल अशी सुंगधीत तंबाखू विक्री होणार्या नेवाशातील ठिकाणांवर विविध पथकांद्वारे छापा टाकून परवेज इसाक शेख (रा. जुनी कोर्ट गल्ली नेवासा खुर्द), वसीम मोहम्मद शेख (रा. नाईकवाडी गल्ली), सुलेमान इसाक मनियार (रा. जुनी कोर्ट गल्ली), अब्दुला अल्ताफ सय्यद (रा. इस्लामपुरा गल्ली), यासीन वावा शेख (रा. जुनी कोर्ट गल्ली), सय्यद अजीम सलीम (रा. जुनी बाजारपेठ), जावेद फज्जु शेख (रा. जुनी कोर्ट गल्ली), अफरोश युसूफ शहा (रा. लक्ष्मीनगर) या सर्वांचे दुकानात व घरी छापा टाकला असता राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली व शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ, सुंगधीत तंबाखू मावा तयार करण्याचे मशीन असा 2 लाख 74 हजार 50 रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आला. वरील सर्वांवर पोलीस हवालदार अजय साठे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275, 3(5) सह अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26,26 (2), 27 (3) (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार, उपनिरीक्षक संदीप ढाकणे, उपनिरीक्षक विजय भोंबे, उपनिरीक्षक विकास पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक श्रध्दा वैद्य, सहायक फौजदार गणेश नागरगोजे, हवालदार अजय साठे, संतोष राठोड, शहाजी आंधळे, सुधाकर दराडे, संगीता पालवे. पोलीस नाईक किरण पवार, संजय माने, कॉन्स्टेबल श्रीनाथ गवळी, अवि वैद्य, कॉन्स्टेबल सुमित करंजकर, भारत बोडखे, नारायण डमाळे, आप्पा तांबे, आप्पा वैद्य, गणेश फाटक, संदीप ढाकणे, दिलीप घोळवे, भारती पवार, वर्षा कांबळे, वर्षा गरड, गिता पवार व होमगार्ड यांच्या पथकाने केली आहे.