Friday, April 25, 2025
Homeनगरमावा रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याचे उत्पन्न घटले

मावा रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याचे उत्पन्न घटले

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

नाशिक, नगर जिल्ह्यात पोळ्याच्या अगोदर लाल कांद्याचे पीक घेण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र यावर्षी वातावरणातील बदलामुळे कांदा पीक अडचणीत आले आहे. पोळ कांद्याचे उत्पादन तालुक्यातील येवला कोपरगाव तालुका हद्दीत जास्त प्रमाणावर घेतले जाते. मात्र यावर्षी कांदे लावल्यानंतर आलेल्या पावसाने कांद्यांना झोडपले. त्यामुळे वाफ्यामध्ये लावलेले कांदे कमी झाले. सततच्या माव्याच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला.

- Advertisement -

शेतकर्‍यांना एकरी कांदा शेतीची मशागतीसह काढणीपर्यंत पन्नास हजार रुपयांच्या आसपास खर्च येतो. चालू वर्षी मात्र या कांद्याचे उत्पन्न सरासरी पेक्षा कमी निघण्याचे चिन्ह दिसत आहे. एकरी 100 ते 125 क्विंटल उत्पन्न काढणार्‍या शेतकर्‍यांचे कांद्याचे उत्पन्न यावर्षी 50 ते 55 क्विंटलच्या आसपास येणार असल्याने मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. शेतकर्‍यांच्या या आर्थिक तोट्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलावीत. प्रत्येक महसूल सर्कल अंतर्गत कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकार्‍यांकडून या कांद्याची पाहणी करून उत्पन्न किती कमी झाले याचा अहवाल सरकारकडे सादर करावा व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केशवराव जाधव यांनी केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...