Saturday, July 27, 2024
Homeनगरनगरच्या रस्ते विकासासाठी 50 कोटी द्या

नगरच्या रस्ते विकासासाठी 50 कोटी द्या

अहमदनगर | प्रतिनिधी

नगर शहरातील रस्त्यांच्यासाठी (Ahmednagar Road) विशेष निधीतून सुमारे 50 कोटी रुपयांची मागणी नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांच्याकडे करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) येथे महापौर सौ.रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी मंत्र्यांची भेट घेवून ही मागणी केली. मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत निधी उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करु, असे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचा दावा महापौरांनी केला आहे.

- Advertisement -

आमदारांच्या दबावामुळे खोटा गुन्हा

या भेटीप्रसंगी माजी नगरसेवक संजय शेंडगे (Former corporator Sanjay Shendge) उपस्थित होते. ना.शिंदे यांना निवेदन देण्यात आले. अहमदनगर महानगरपालिकेत (Ahmednagar Municipal Corporation) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून शिवसेनेची (Shivsena) सत्ता स्थापना झाली आहे. नगर शहरातील (Ahmednagar city) नागरिकांना शिवसेनेकडून विकासाची मोठी अपेक्षा आहे. अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीत शासनाच्या अमृत योजने अंतर्गत भुयारी गटार योनेचे काम सुरु आहे. सदर योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे.

रस्ते दुरुस्त करणे आवश्यक असून, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने महानगरपालिका निधीतून हे रस्ते दुरुस्त करणे शक्य नाही. या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधींची आवश्यकता आहे. शहर व उपनगरातील मुख्य रस्त्यांचे क्रॉक्रीटीकरण कामासाठी निधी उपलब्ध करुन दिल्यास रस्त्याचे काम करणे शक्य होईल व शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल. या कामासाठी सुमारे 50 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या