जळगाव –
येथील रायपूर,कुसुंबा भागातील मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम प्ले स्कूल मध्ये शासकीय परिपत्रकाप्रमाणे “वॉटर बेल” उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बेल झाल्यावर पुरेसे पाणी पिले.
विद्यार्थ्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता राहून त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते, हि बाब शासनाच्या निदर्शनास आल्यावर “वॉटर बेल” उपक्रम सुरु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे.
मुलांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण वाढावे आणि त्यांच्या संभाव्य आजारांचा धोका टाळावा याकरिता “वॉटर बेल” उपक्रम आहे. त्यानुसार मयुरेश्वर स्कूल येथे “वॉटर बेल” उपक्रम संस्थेचे अध्यक्ष गजेंद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ.भारती परदेशी मॅडम यांनी शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास काय परिणाम होतात व पाणी वेळोवेळी तसेच कधी प्यावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी शिक्षिका.सौ.मीनाताई देसले , सौ.शीतल चौधरी , माधुरी पाटील यांनी सहकार्य केले. या प्रसंगी विद्यार्थ्यांसह पालक उपस्थित होते.