Monday, August 17, 2026
Homeक्राईमAhilyanagar : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह दोघे जेरबंद

Ahilyanagar : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह दोघे जेरबंद

अकोलेतील दरोड्यासह आश्वी, राहाता, लोणी, अहिल्यानगर तालुका, पारनेर आणि घारगावातील 10 गुन्हे उघड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अकोले तालुक्यातील औरंगपूर येथे पहाटे घरात घुसून कुटुंबाला धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटणार्‍या टोळीतील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. या कारवाईत अकोले येथील दरोड्यासह जिल्ह्यातील आश्वी, राहाता, लोणी, अहिल्यानगर तालुका, पारनेर आणि घारगाव पोलीस ठाण्यांतील घरफोडी, दरोडा आणि चोरीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.

- Advertisement -

16 मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास औरंगपूर येथे अशोक केरू वाळुंज यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला. त्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. तसेच कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लुटून पोबारा केला. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, अमोल आजबे, प्रशांत राठोड, अरूण मोरे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने तपास सुरू ठेवला.

तपासादरम्यान संशयित अजय सादीश काळे हा त्याच्या साथीदारांसह वाळकी (ता. अहिल्यानगर) परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून अजय सादीश काळे (वय 24, रा. वाळुंज) आणि अक्षय ऊर्फ सोन्या अर्पण भोसले (वय 26, रा. घानेगाव, ता. पारनेर) यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी अकोलेतील दरोड्याची कबुली दिली. तसेच गणेश भोसले, तुकाराम भोसले, बाळू भोसले, आशिष भोसले, शरद काळे, निकेश काळे आणि धीरज काळे या साथीदारांसह गुन्हा केल्याचे सांगितले. चोरीतील सोन्या-चांदीचे दागिने किरण भाऊसाहेब बेंद्रे याला विकल्याचीही माहिती अजय काळे याने पोलिसांना दिली.

संबंधित सर्व संशयित सध्या पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. तपासात अजय काळे हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरूध्द दरोडा, जबरी चोरी, घरफोडी आणि चोरीचे तब्बल 11 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल असून पारनेर पोलीस ठाण्यात त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आलेली आहे. अक्षय ऊर्फ सोन्या भोसले याच्याविरूध्दही दरोडा, घरफोडी आणि चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...