अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
हॉटेलमध्ये जेवण (Meals at the Hotel) करून घराकडे निघालेल्या वैद्यकीय व्यावसायिकासह (Medical Professional) त्यांच्या भावाला व मित्रांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) केल्याची घटना रविवारी (दि. 16) रात्री सव्वा बारा वाजता विळद (Vilad) (ता. नगर) शिवारात विखे पाटील हॉस्पिटल समोर घडली.
मारहाणीत व्यावसायिक धनवान मच्छिंद्र दिघे (वय 34 रा. वैभव कॉलनी, सावेडी), त्यांचा भाऊ विक्रांत दिघे व मित्र मंगेश गुप्ता, प्रवीण व्यवहारे जखमी (Injured) झाले आहेत. जखमी धनवान दिघे यांनी उपचारादरम्यान एमआयडीसी पोलिसांना (MIDC Police) दिलेल्या जबाबावरून अनोळखी पाच ते सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. धनवान दिघे, त्यांचा भाऊ विक्रांत, मित्र मंगेश गुप्ता व प्रविण व्यवहारे यांनी खालसा पंजाब हॉटेलवर जेवण केले.
बीआरएसच्या खासदाराने घेतले मुरकुटेंच्या घरी स्नेहभोजन!
ते जेवण झाल्यानंतर त्यांच्या चारचाकी वाहनातून (Car) नगरकडे येण्यासाठी निघाले. ते विखे पाटील हॉस्पिटलच्या गेट समोर लघुशंकेसाठी थांबवलेले असताना तेथे अनोळखी पाच ते सहा जण आले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडके होते. त्यांनी कोणतेही कारण नसताना धनवान यांच्यासह त्यांच्या भावाला व मित्रांना मारहाण (Beating) केली. चारचाकी मर्सडिजची तोडफोड (Mercedes Car Vandalism) करून नुकसान केले. मारहाण करून सदरचे अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडील दुचाकी व चारचाकी वाहनातून निघून गेले. जखमी धनवान यांच्यासह चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी अनोखळी पाच ते सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार खैरे करीत आहेत.
अंकुश चत्तर हल्ला प्रकरण; नगरसेवक शिंदेसह पाच जण एलसीबीच्या ताब्यातअपहरण झालेल्या बाळाची तीन तासात सुटका