मुंबई | Mumbai
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Shivaji Park) मैदानाजवळील स्वर्गीय मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, शिवसैनिक (Shivsainik) तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पोलिसही या परिसरात दाखल झाले असून अधिक माहिती घेतली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७.३० ते ८ वाजेच्या सुमारास पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पुतळ्याच्या आजूबाजूला लाल रंग उडाला असल्याचे दिसून आले. सध्या आजूबाजूचा लाल रंग शिवसैनिकांनी पुसून काढत साफसफाई केली आहे.
तसेच ठाकरेंच्या शिवसेनेकडून यासंदर्भात पोलिसात (Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक प्रचंड मानायचे. १९९५ साली मीनाताई ठाकरे यांचे निधन (Passed Away) झाले होते. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा याठिकाणी आहे. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार अनिल देसाई यांनी परिसराची पाहणी केली असून, उद्धव ठाकरेंनाही (Uddhav Thackeray) या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. दुपारी उद्धव ठाकरे या ठिकाणी भेट (Visit) देण्याची शक्यता आहे.




