ओझे l विलास ढाकणे Oze
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गट व गण आरक्षण यादी जाहीर झाल्यानंतर, महायुतीने निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने दिंडोरी येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली.बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती नव्हती. मात्र, भ्रमणध्वनीद्वारे नामदार नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधून चर्चा करण्यात आली.
या निवडणुकीत महायुतीत सामील असलेले तिन्ही पक्ष – भाजपा, शिवसेना (शिंदे गट), आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – एकत्रितपणे निवडणूक लढविणार असून, उमेदवार निवडीचे अधिकार प्रमुख नेत्यांना देण्याचे ठरले आहे.त्याअनुसार,राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – नामदार नरहरी झिरवाळ,भारतीय जनता पक्ष (भाजप) – माजी केंद्रीय मंत्री भारती ताई पवार,शिवसेना (शिंदे गट) माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारीच्या निवडीचे अधिकार एकमताने देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले,भाजप प्रदेश कमिटी सदस्य शाम बोडके, शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष सुरेश डोखळे,, मविप्र संचालक प्रवीण नाना जाधव ,कृउबा समिती संचालक नरेंद्र जाधव,भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके,चिटणीस किरण तिवारी, तालुका अध्यक्ष शाम मुरकुटे,वसंत कावळे,वलखेड सरपंच विनायक शिंदे, योगेश मातेरे,महेंद्र पारख,नाना मोरे, कैलास पाटील ,माधवराव उगले, कैलास गणोरे ,रतन बस्ते नंदू बोंबले, तुकाराम जाधव ,माणिक उफाडे, योगेश दावंगे ,वैभव महाले, किशोर अपसुंदे, गणेश हिरे ,अमोल देशमुख ,उत्तम जाधव, शांताराम जोंधळे ,मंगेश कदम ,हिरामण फलाणे, बंडु भेरे आदीसह भाजप,शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
ही बैठक भविष्यातील निवडणुकीच्या रणनीती, समन्वय व जागावाटपाच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाची ठरली आहे.
तसेच येणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जेष्ठ नेत्यांची समनव्य समिती स्थापन करण्यात आली असून एकत्रित निवडणूक लढण्याविण्याचा सर्वानी निर्धार केला आहे.





