Tuesday, March 25, 2025
Homeजळगावसरकारने एक हाताने दिले व अनेक मार्गांनी काढले- नितीन बानुगडे

सरकारने एक हाताने दिले व अनेक मार्गांनी काढले- नितीन बानुगडे

पाचोरा । प्रतिनिधी

सरकारने लाडकी बहिण सारख्या योजनांमधून एका हाताने दिले असले तरी अनेक हातांनी काढल्याची टिका ख्यातनाम वक्ते प्रा.नितीन बानुगडे यांनी केली. ते पिंपळगाव हरेश्वर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलत होते.

- Advertisement -

याप्रसंगी नितीन बानुगडे पाटील म्हणाले की, मी याआधी देखील येथे येऊन गेलेलो आहे, पण मातोश्री सोबत गद्दारी झाली असून वैशालीताई सुर्यवंशी या उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहिलेले आहेत. यामुळे आपणा सर्वांना निष्ठावंत वैशालीताई यांना निवडून द्यायचे आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कपाशीला 11 हजार रूपयांचा भाव मिळत असताना आज तो फक्त साडेसहा हजारावर थांबलेला आहे. यामुळे महाभ्रष्ट महायुतीच्या सरकारला खाली खेचून या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी दिपकसिंग राजपूत, ॲड.ललिता पाटील, गणेश परदेशी, ओंकार बाबा नाईक, प्रियंका जोशी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात नितीन बानगुडे पाटील यांच्यासह रमेश बाफणा, अरूण पाटील, अभय पाटील, उद्धव मराठे, भैय्यासाहेब ईस्माईल शेठ, बशीर शेख, सागर गावते, रसूल शेठ, राजेंद्र महाजन, वैशालीताई सूर्यवंशी, प्रकाश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष वक्ते नितीन बानुगडे पाटील, देवीदास महाजन, भास्कर नाना, राजेंद्रसिंग देशमुख, अमरसिंग देशमुख, रवींद्र जाधव, राजू मोतीलाल माळी, कैलास आप्पा क्षीरसागर सरपंच, सुरेश बापू बडगुजर, राजधर आबा, गोविंद माधवराव, सुरेश गुजर, कडुबा टेलर, वसंत महाजन, गुलाम दस्तगीर-सलीम शेख, नबाब अब्बास, दगडू समींदर तडवी, बी.आर.महाजन, भिका शेठ तैनाप, कडुबा आप्पा तैनाप, महादू सांडू वाघ, प्रशांत भास्कर पाटील, शरद पाटील, भास्कर धनजी पाटील, कोमलसिंग देशमुख, भगवान पाटील, कैलास फकिरा क्षीरसागर, देविदास आप्पा, अजय कडूबा तेली, मिलिंद देव, हिलाल पाटील, अण्णाभाऊ परदेशी, डॉ.एल.टी. पाटील, प्रेमचंद पाटील, अरूण तांबे, शशी पाटील, दिलीप देशमुख, तानिया चौधरी, सिंकदर तडवी, कोमल आबा, अजय कडूबा तेली, राहूल बडगुजर, विलास भाऊ, समाधान हटकर, भारत क्षिरसागर, प्रशांत पाटील, विरेंद्रसिंग देशमुख, राजेंद्र देशमुख, राहूल चौधरी, ज्ञानेश्वर बडगूजर, मुकेश निकम, सागर क्षिरसागर, गजानन उमाळे, चेतन बडगुजर, बबलू रामसे, सलीम शेठ, बी.डी. पाटील यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...