Friday, May 16, 2025
Homeधुळेजि.प अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी 15 रोजी सभा

जि.प अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी 15 रोजी सभा

धुळे Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा वाढीव मुदतीचा कालावधी संपुष्टात येत असल्यामुळे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी दि. 15 ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

पिठासन अधिकारी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी इच्छुंकाची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जि.प.त भाजपाचे बहुमत असल्याने नेत्यांवर धुळे जिल्ह्यातील भाजपाचे नेते कोणाच्या नावाची शिफारस करतील, याबाबत मोठी उत्सुकता आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ दि. 16 जुलै 2022 रोजी संपुष्टात आलेला होता. त्यानुषंगाने ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिवांनी दोन्ही पदांना दि. 17 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. आता तीही संपुष्टात येत असल्यामुळे उर्वरीत कालावधीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण (महिला) करीता अधिसुचीत करून देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी दि. 15 ऑक्टरोबर रोजी विशेष सभा घेण्याचे आदेश दिले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...