Wednesday, June 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहिला आणि बालविकास विभागात मेगाभरती - मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

महिला आणि बालविकास विभागात मेगाभरती – मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

विभागात ८ हजार ६६९ पदे भरणार

मुंबई / प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्यातील महिला तसेच बालकांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागात लवकरच ८ हजार ६६९ पदे भरण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शनिवारी दिली. याशिवाय २ हजार ८४३ बाह्यस्त्रोत पदे तसेच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रत्येकी १ लाख १० हजार ६६४ मानधनावरील पदांना मान्यता दिली आल्याचे तटकरे यांनी सांगितले.

महिला आणि बाल विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध ११ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आल्याची माहिती तटकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमातून दिली. सन २००३ नंतर म्हणजेच तब्बल २३ वर्षांनंतर विभागाच्या रचनेत हा मोठा बदल करण्यात आला असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

बदलत्या गरजा लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केलेल्या १६५ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विभागातील एकूण पदांचा आढावा घेताना काही पदे रद्द करण्यात आली आहेत. विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांतील गट-अ ते गट-ड मधील एकूण ८ हजार ६६९ नियमित पदांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र समाज कल्याण मंडळ मुंबई येथील १५ कार्यरत आणि ३२ प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचे आता आयुक्त, महिला आणि बाल विकास, पुणे यांच्या अधिनस्त रिक्त पदांवर समकक्ष वेतनात समायोजन केले जाणार आहे, अशी माहितीही तटकरे यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून सभासद संस्थांच्या (सेवा सोसायट्यांच्या) प्रतिनिधींचे ठराव 17...