राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणार्या नेत्यांची गरज असते. केवळ जिल्ह्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणार्या महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री दिवंगत ए.टी.पवार (दादासाहेब) यांच्या उक्ती आणि कृतीचा वारसा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जपला आहे.
प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत ताईंनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. देशात विकासाच्या नवनव्या संकल्पना त्या मांडत आहेत. जिल्हा परिषद सदस्य ते भारत देशाच्या आरोग्य राज्यमंत्री अशी गरुडझेप घेणार्या आपल्या अजोड कर्तृत्वामुळे देशाच्या राजकारणात स्वर्णिम भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील विकासकन्या म्हणून ख्याती मिळवलेल्या या असामान्य नेतृत्वाचा आज दि. 13 सप्टेंबर रोजी वाढदिवस.शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून भारतीताई यांचे देशाच्या राजकीय पटलावर नावलौकिक आहे. लोकहितार्थ निर्णय, विकासाभिमुख कारभार, कर्तव्यदक्ष, लोकसंग्रह,करोना काळात संबंध जगाला हेवा वाटावा असे आरोग्य सेवेचे काम,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वच्छ प्रतिमा असलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच भारतीताई.
भारती ताई यांना सासरे ए. टी. पवार यांच्याकडूनच राजकीय बाळकडू मिळाले. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यत्व भूषविणार्या ताई या तशा मितभाषी अन अभ्यासूही आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार्या, विकासकामात राजकारण, पक्षीय भेदभाव न करता प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवणार्या, आरोग्यक्रांती करुन असंख्य रोगराईंच्या महामारीला आळा घालणार्या या लोकसेवकीने जनतेच्या ह्रदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे.
लेखक : मनोज बेलदार,स्वीय सहायक, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
शब्दांकन – फारुक पठाण, प्रतिनिधी