Saturday, May 18, 2024
Homeनाशिकएमडीचा विळखा सुटेना; युवकाकडून ८७ हजारांचे मेफेड्राेन हस्तगत

एमडीचा विळखा सुटेना; युवकाकडून ८७ हजारांचे मेफेड्राेन हस्तगत

नाशिक । प्रतिनिधी

दुय्यम प्रतिचे एमडी बनवून विक्रीसाठी कुप्रसिद्ध झालेल्या नाशकात दहाव्यांदा एमडी ड्रग्ज मिळाले आहे. युनिट एकच्या पथकाने बुधवारी(दि. १४) म्हसरुळ भागातील युवकाकडून ८७ हजारांचे मेफेड्राेन हा अमली पदार्थ हस्तगत केला असून आडगाव पाेलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. जप्त केलेले ड्रग्ज विक्री करण्यासाठी आणण्यात आल्याचे तपासात समाेर आले आहे.

- Advertisement -

धम्मराज उर्फ सागर बाळासाहेब शार्दुल(वय १८, रा. भाजी मंडईमागे, म्हसरुळ, नाशिक) असे संशयित ड्रग्जडिलरचे नाव आहे. मुंबई पाेलिसांनी चार महिन्यांपूर्वी शिंदेगावातील ललीत व भूषण पानपाटील या बंधूंच्या ड्रग्ज कारखान्यावर धाड टाकून १०० काेटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केले हाेते.

त्यानंतर नाशिक पाेलिसांच्या गुन्हेशाखा युनिट एक आणि एनडीपीएस पथकाने विविध ठिकाणी धाडी आणि कारवाया करुन काेट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले हाेते. वडाळागावातील छाेटी भाभी, तिचा पती आणि इतर असे ३५ हून अधिक ड्रगपेडलर ताब्यात घेऊन एनडीपीएस कायद्यान्वये नाशकात ४ हून अधिक गुन्हे दाखल केले. या ‘एमडी’ मुळे अमली पदार्थाचे डेस्टिनेशन म्हणूण नाशिक कुप्रसिद्ध झाले हाेते.

दरम्यान, आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य गृहविभागाने निवडणूक आयाेगाच्या सूचनेनुसार तीन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ एकाच जिल्ह्यात कार्यकारी पदावर असणाऱ्या पाेलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या आणि त्या अधीच्या काही कालावधीत एमडी ड्रग्जच्या कारवाया थंडावल्या हाेत्या आणि सर्वच प्रकरणे शांत झाली हाेती.

तपास पथकांकडून या गुन्ह्यांचे दाेषाराेप पत्र दाखल करण्याची प्रकिया सुरु असतानाच (दि. १४) युनिट एकच्या पथकाने सायंकाळी पाच वाजता आडगाव हद्दीतील हनुमान नगरकडे जाणाऱ्या राेडवरील हाॅटेल पेशवाच्या मागे सापळा रचून कारवाई केली. सागर शार्दुल हा ड्रग्ज विक्रीसाठी आला असता त्याला पकडण्यात आले. त्याने हे ड्रग्ज कुठून आणले व त्याचा मुख्य सूत्रधार कुठला आहे, ड्रग्जसाखळी कशी चालवित हाेते, याचा तपास आडगाव पाेलिस करत आहेत.

१८ वर्षांचे मुल व्यवसायात

नाशिक पाेलिसांनी ड्रग्ज साखळीत आतापर्यंत ३५ ते ४० ड्रग्जडिलर आणि, पेडलरांवर कारवाई केली आहे. अनेकांना साेलापुर, मुंबई, भिवंडी, नाशिक, सामनगाव, हैद्राबाद, केरळ येथून अटक केली आहे. काही संशयित जामीनावर असून काही तुरुंगात आहेत. विशेष म्हणजे करण्यात आलेल्या कारवायांत अटकेतील संशयितांचे सरासरी वय १८ ते ३५ च्या दरम्यान आहे. हा वयाेगट या जीवघेण्या व्यवसायात उतरल्याने ती चिंतेची बाब ठरत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या