Sunday, May 18, 2025
Homeनगरव्यापारी असोसिएशन विरोधात मोठा असंतोष

व्यापारी असोसिएशन विरोधात मोठा असंतोष

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

- Advertisement -

शहरातील व्यापार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या श्रीरामपूर मर्चंट्स असोसिएशन या संघटनेच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल शहरातील व्यापार्‍यांमध्ये मोठा असंतोष पसरला असून श्रीरामपूर बंदच्या निमित्ताने ही दुफळी समोर आली आहे. सर्वसमावेशक अशी श्रीरामपूर व्यापारी महासंघ नावाची संघटना स्थापन करावी, अशी मागणी होत आहे.

मर्चंट्स असोसिएशन ही शहरातील व्यापार्‍यांची एकमेव संघटना आहे. संघटनेचे सभासद अवघे पाचशेच्या आसपास असून शहरातील व्यापार्‍यांच्या एकूण संख्येपैकी ही संख्या फक्त दहा टक्के आहे. त्यातून निवडून जाणारे सदस्य हे सर्व व्यापार्‍यांचे प्रतिनिधित्व करीत नाहीत.

करोनाच्या निमित्ताने शहरामध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झालेली असताना व्यापारी संघटनेने बाजारपेठ चार दिवस बंद करण्याचे आवाहन केले. यानिमित्ताने व्यापार्‍यांनी या बंदला कडाडून विरोध केला. काही व्यापार्‍यांनी त्यांना प्रतिसाद दिला. मात्र बहुतांश व्यापार्‍यांनी आपली दुकाने सुरू ठेवून या बंदला विरोध दर्शवला.

यानिमित्ताने मर्चंट्स असोसिएशन विरोधात शहरातील व्यापार्‍यांमध्ये असलेला असंतोष समोर आला. शहरांमध्ये लहान मोठे पाच ते सहा हजार व्यापारी आहेत. भाजीवाल्यापासून तर छोटे-मोठे किराणा दुकानदार, धान्य विक्रेते, स्टेशनरीवाले, कापड व्यवसायिक, भांडी विक्रेते, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रेते, जनरल स्टोअर्स अशा विविध प्रकारचे व्यापारी पेठेत असताना व्यापारी असोसिएशनमध्ये मात्र ठराविक गटाचे लोकच पदाधिकारी म्हणून व संचालक म्हणून कार्य करतात. लहान व्यापार्‍यांकडे ही संघटना कधीही लक्ष देत नाही. छोट्या व्यापार्‍यांवर होणार्‍या अन्यायाला कधीच वाचा फोडली जात नाही. अशा प्रकारची भावना शहरातील व्यापार्‍यांमध्ये प्रबळ झाली आहे.

शहरातील सर्व प्रकारच्या व्यापार्‍यांना सामावून घेणारी सर्वसमावेशक अशी श्रीरामपूर व्यापारी महासंघ नावाची संघटना स्थापन करावी, अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे.

बाजारपेठेतील सर्व प्रकारच्या व्यापार्‍यांशी चर्चा करून त्याबाबतची नियमावली व आराखडा तयार केला जाणार आहे. असोसिएशनचे सभासदत्व मिळविण्यासाठी फार मोठी रक्कम मोजावी लागते. एवढ्या मोठ्या रकमेची गरज काय? असा प्रश्न असून सर्वसामान्य व्यापार्‍यांना सभासदत्व का दिले जात नाही? त्यामागील कारणे कोणती याचीही चर्चा व्यापारी वर्गात होत आहे.

श्रीरामपूर बंदच्या निमित्ताने शहरातील व्यापार्‍यांमध्ये असलेला एकंदरित असंतोष समोर आल्याने नवीन व्यापारी महासंघ तयार होणार हे आता निश्चित झाले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Onion Price : राहाता बाजार समितीतील कांद्याचा वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला जास्तीत जास्त 1500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. रविवारी राहाता बाजार समितीत...