Saturday, November 23, 2024
Homeभविष्यवेधबुधाची मोलाची साथ, गडकरींना तिसर्‍यांदा मंत्रीपद...

बुधाची मोलाची साथ, गडकरींना तिसर्‍यांदा मंत्रीपद…

नितीन जयराम गडकरी यांचा जन्म 27 मे 1957 रोजी झाला ते 5 जून 2024 पासून मोदी सरकारमध्ये तिसर्‍यांदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून कार्यरत झाले आहेत. गडकरी रस्ते वाहतूक आणि महामार्गासाठी सर्वात जास्त काळ काम करणारे केंद्रीय मंत्री देखील आहेत. गडकरी यांनी यापूर्वी 2009 ते 2013 पर्यंत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तळागाळातील नेते म्हणून ओळखले जाणारे, भारतीय जनता पक्षाचे हेवीवेट नेते नितीन गडकरी गेल्या 10 वर्षांपासून आठवड्याच्या एक दिवशी म्हणजे प्रत्येक शुक्रवारी नागपूरला घरी मुक्कामाला असतात. नागपुरातील वास्तव्यात गडकरी त्यांच्या कार्यालयात सामाजिक प्रश्न सोडविण्यात व्यस्त असतात व आपल्या शेतीच्या व्यवसायाचा आढावा घेतात.

गडकरी लोकसभेत नागपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी यापूर्वी जलसंपदा आणि नदी विकास, जहाजबांधणी, ग्रामीण विकास आणि एमएसएमई यासह विविध खात्यांमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची सुरुवात आणि द्रुतगती मार्ग आणि इतर रस्ते पायेाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे प्रसारमाध्यमांद्वारे त्यांना अनेकदा ‘एक्स्प्रेसवे मॅन ऑफ इंडिया’ म्हणून संबोधले जाते. गडकरींनी नेहमी खाजगीकरणाचे जोरदार समर्थन केले आहे आणि खाजगी कंपन्यांकडून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रचार केला. त्यांनी खाजगी गुंतवणूकदार, कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक आणि विविध व्यापारी संघटना यांच्यातील अनेक बैठकांना संबोधित केले आणि मोठ्या प्रमाणात बजेट केलेले प्रकल्प खाजगीकरणाकडे वळवले, त्यानंतर, राज्य सरकारने ग्रामीण कनेक्टिव्हिटीसाठी 7 अब्जांची तरतूद केली. गडकरी यांचे प्रयत्नाने पुढील चार वर्षांत, महाराष्ट्रातील सर्व- रस्ते 98% लोकसंख्येपर्यंत पोहोचेल इतकी वाढविण्यात आली. या प्रकल्पाचे उद्दिष्ट 13,736 दुर्गम गावांना रस्त्याने जोडण्याचे होते जे स्वातंत्र्यानंतरही जोडलेले नव्हते. गडकरी यांनी रस्त्यांचा विस्तार अमरावती जिल्ह्यातील दुर्गम मेळघाट- धारणी भागात वाढवल्याने, आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्यास मदत केली व ज्यांना पूर्वी वैद्यकीय मदत, रेशन किंवा शैक्षणिक सुविधा सुद्धा उपलब्ध होत नव्हत्या. गडकरी यांनी तुहिन सिन्हा यांच्या, सह-लेखक असलेल्या इंडिया स्पायर्स या पुस्तकात, देशासाठी त्यांच्या विकासाच्या कल्पनांचा तपशीलवार उल्लेख केला आहे.

गडकरींच्या यांच्या विकास आराखड्यात हरित ऊर्जा, पर्यायी इंधन आणि प्रभावी कचरा व्यवस्थापनासाठी वाढीव संस्थात्मक पाठबळ याला त्यांनी विशेष महत्त्व आहे. नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसर्‍यांदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला, मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांच्या दृष्टीकोनाची रूपरेषा आखली आणि त्यांच्या नवीन कार्यकाळासाठी अजेंडा निश्चित केला.सूत्रांनी सांगितले की, त्यांच्या सुरुवातीच्या बैठकीत गडकरींनी रस्ते सुरक्षा, महामार्ग नेटवर्कचा विस्तार आणि इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधांना चालना देण्यासह अनेक महत्त्वपूर्ण प्राधान्यांवर भर दिला. रस्ते अपघात कमी करण्याचे महत्त्व अधोरेखित करून, त्यांनी 2030 पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये 50% घट करण्याच्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला.

नितीन गडकरी यांच्या विकासात्मक दूरदर्शीपणा, पर्यावरण पूरक, जनहित लक्षात घेऊन त्यांनी सर्वसमावेशक आमूलाग्र बदल भारताच्या रस्ते विकासात केले. भारतातले मोठे महानगर रस्ते मार्गाने जोडण्याबरोबरच, त्यात महत्वाचे म्हणजे आपत्कालीन प्रसंगात दळण वळण सह्जरित्या व्हावे म्हणून हिमालयाच्या कुशीतील गावात व देशाची सीमा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने दुर्गम भागात रस्ते बांधले.. गडकरी यांनी रस्ते बांधकामात व त्यांचे विकासात जागतिक उच्चांक केला, हे सर्व करण्यासाठी त्यांच्यात असलेली अति शुभ बुध ग्रहाची हुशारी कामास आली. गडकरी यांचा डाव्या व उजव्या हाताचे फोटो उपलब्ध झाल्याने त्यांच्या हातावरील सर्व रेषा व ग्रह यांचे हस्तसामुद्रिकदृष्ट्या परीक्षण आजच्या भविष्यवेध अंकात देत आहे. नितीन गडकरी यांच्या भावभावना वात्सल्यपूर्ण आहेत, हृदय रेषेचा उगम गुरु ग्रहाच्या मध्यावरून होत असून ही हृदय रेषा कमानदार होऊन बुध ग्रहाच्या खाली करंगळीच्या बाहेर गेली आहे. या हृदय रेषेस गुरु ग्रहाचे शुभ गुण लाभले आहेत, त्यात स- हृदयता, उत्कट प्रेम भावना, सज्जनपणा, माणुसकीचा ओलावा, कर्तव्य, कायदे पालन व एक नंबरच्या व्यवसायात काम करण्याचे ध्येय ठेवणारा व निष्ठापूर्वक नियोजनबद्ध देशासाठी अविरत काम करण्याची प्रेरणा, गुरु ग्रहाने व कमानदार हृदय रेषेने प्रदान केली आहे. गडकरी यांच्या दोन्ही हातावरील हृदय रेषेचा एक स्वतंत्र फाटा गुरु ग्रहावर मस्तक रेषेकडे झुकलेला आहे, त्यामुळे त्यांच्यात अधिक भावना प्रधानता आली आहे.

नितीन गडकरी यांच्या हातावरील पहिले म्हणजे गुरु ग्रहाचे बोट लांबीला छोटे आहे, परंतु गुरु ग्रहाचा आकार विस्तारित आहे त्यामुळे गडकरी यांच्यात गुरु तत्व खूप मोठे आहे. हातावरील पहिले बोट लांबीला मोठे असता नेतृत्व करून राजकारण करण्याची आस मोठी असते,तसेच भ्रामक कल्पनांची वृद्धी होते. गडकरी यांचे हातावरील रवी ग्रहाचे म्हणजे तिसरे बोट मोठे आहे, हातारील तिसरे बोट लांबीला पहिल्या बोटाच्या मानाने मोठे असता कायम प्रसिद्धीत राहण्याची इच्छा असते, जीवनात यश मिळण्यासाठी किंवा इप्सित साध्या करण्यासाठी यांचा कायम खटाटोप हा चालू असतो.
हाताचा आकार व बोटांची लांबी ही सामुद्रिकशास्त्राप्रमाणे प्रमाणात असावी लागते, त्यात पहिले आणि तिसरे बोट लांबीला एकसारखे, मधले बोट सर्वात मोठे, चौथे करंगळीच्या बोट व त्या बोटाची लांबी तिसर्‍या बोटाच्या पहिल्या पेरापर्यंत, याप्रमाणे असे मानक सामुद्रिकशास्त्रात नमूद आहे. बोटांच्या तिसर्‍या पेरा नंतर हातावर अनुक्रमे गुरु, शनी, रवी व बुध ग्रह विराजमान असतात व बोटांच्या आकाराचा व लांबी रुंदीचा, बोटांखाली असलेले ग्रहांवर शुभ- अशुभ परिणाम घडवून आणतात. जसे कि एखाद्याची करंगळी म्हणजेच बुधाचे बोट सरळ ताठ नसेल व किंचित वक्र किंवा थोडे तिरके जन्मतःच असले तर यांच्यात बुध ग्रह, लबाडी करण्याची उर्मी देतो व या लबाडीचा उपयोग योग्य वेळी करण्याची व आपला कार्यभाग साधण्याची हातोटी त्यांचेकडे असते.

गडकरी यांचे हातावरील आयुष्य रेषा त्यांचे वय वर्ष 25 ते 45 पर्यंत नाजूक आहे या वय वर्षात गडकरी यांची शारीरिक क्षमता व रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे. वय वर्ष 45 लाच आयुष्य रेषेतून उगम पावणारी भाग्य रेषा बारीक, पातळ, तलम व भाग्यकारक आहे, याच काळात ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले. आयुष्य रेषेच्या आत वय वर्ष 21 पासून मंगळ रेषा उगम पावत असून ही मंगळ रेषा आयुष्य रेषेला वय वर्ष 60पर्यंत साथ देत आहे. गडकरी यांची वय वर्ष 25 ते 45 दरम्यान आयुष्य रेषा नाजूक झाली तरी मंगळ रेषेने त्यांच्यात अधिकची ऊर्जा प्रदान केली व या मंगळ रेषे मुळेच राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे शिव धनुष्य गडकरी यांनी समर्थ पणे पेलले. गडकरी यांच्या आयुष्य रेषेतून मनगटाचे थोडे वरपासून; रवी रेषेचा उगम होत असून ही रवी रेषा थेट तिसर्‍या बोटाच्या खाली म्हणजे रवी ग्रहावर मधोमध जाऊन थांबली आहे. गडकरी यांच्या हातावरील आयुष्य रेषेतून उगम पावणार्‍या या रवी रेषेमुळे त्यांच्या प्रत्येक प्रयत्नात त्यांना यश मिळत गेले व त्यांनी यशाची शिखरे आजपर्यंत पादाक्रांत केली आहे. जन मानसात कीर्ती प्रसिद्धी, मान सन्मान हा रवी रेषे रुपी भाग्यातच असावा लागतो.


गडकरी यांचे हातावर मुख्य रवी रेषे व्यतिरिक्त आणखी दोन तीन रवी रेषा आहेत, या रवी रेषा गडकरी यांच्या अंगी असलेले चतुरस्त्र गुण व त्यांच्यातील विविध विषय अभ्यासपूर्ण समजून घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याची क्षमता प्रदान करीत आहे. गडकरी यांचे अंगी असलेली विषय जाणून घ्यायची व त्याविषयाची प्रत्यक्षात उपयोगिता सत्यात उतरविण्याची क्षमता, कला व हातोटी आत्मसात आहे. प्रत्येक ग्रहात शुभ अशुभ तत्व असतात, जे मानवाच्या अंगी प्रदान होत असतात. विशेतः बोटांच्या खाली असलेला ग्रहाला उभार असेल व त्यावर तळहाताकडून एक किंवा दोनच रेषा येऊन थांबत असतील तर असे ग्रह शुभ असतात. तसेच दोन बोटांच्या पेरातून खाली ग्रहावर येणार्‍या बारीक पातळ अर्धा ते दिड सेंटीमीटर लांबीच्या सूक्ष्म रेषा ह्या त्या त्या ग्रहात असणारी विद्वत्ता बहाल करतात. बोटांच्या मध्ये मुळापासून खाली हातावर येणार्‍या ह्या अगदी छोट्या रेषा, त्या हर एक व्यक्तीच्या हातावर असत नाहीत. ज्या बोटांच्या मुळातून खाली हातावरील ग्रहावर एकच सूक्ष्म रेषा येत असेल तर फक्त त्या एकट्या ग्रहाची विद्वत्ता व्यक्तीच्या अंगी बहाल असते. आजपर्यंत हस्तरेषाशास्त्रात शनी व रवीच्या बोटांच्या मध्यातून येणार्‍या एक छोट्या सूक्ष्म रेषेला सरस्वती रेषा म्हणून संबोधले जाते. सरस्वती रेषा बुद्धिमान व्यक्तींच्या हातावर असते की ज्या व्यक्ती सर्व नवीन गोष्टी किंवा बाबी शिकताना, बाकीं इतरांपेक्षा पेक्षा अत्यंत जलद आत्मसात करतात; गडकरींच्या हातावर पहिल्या व दुसर्‍या बोटांच्या मुळातून शनी ग्रहावर बारीक पातळ रेषा आली आहे. ही रेषा शनी ग्रहावर आल्याने .गडकरी यांचे अंगी शनी ग्रहाचे शुभ गुण म्हणजे , कार्यमग्नता, समर्पण, संशोधन व चिकाटी ह्या गुणांचा लाभ झाला आहे. गडकरी यांचे हातावर शनी व रवी ग्रहांच्या बोटांतून सरस्वती रेषा रवी आहेच. गडकरी यांच्या तिसर्‍या व चौथ्या बेटांच्या मधल्या भागातून म्हणजे रवी व बुध ग्रहांच्या बोटांच्या मुळातुन आणखी एक बारीक सूक्ष्म रेषा रवी बुध ग्रहाच्या सीमेवर खाली आल्याने गडकरी यांचे अंगी बुध ग्रहाच्या विद्वत्तेचे कारकत्व आले आहे. गडकरी यांच्या चारही बोटांच्या मुळातून तीन बारीक सूक्ष्म रेषा गुरु, शनी, रवी व बुध ग्रहावर आल्याने त्यांच्यात या चारही ग्रहांची शुभ तत्वे त्यांच्यात आली आहेत.

- Advertisement -

हातावर बुध रेषा असता त्या व्यक्तीच्या अंगी स्वतःला पुढे ठेवण्याची कला अवगत असते, तसेच सर्व गोष्टींची व सर्व विषयातील माहिती व मर्म व ज्ञान असण्याचे; यांच्या प्रत्येक कृतीतून ते दाखवून देतात. गडकरी यांना त्यांच्या आयुष्यात बुध ग्रहने मोलाची साथ दिली व देत आहे, त्यांचा त्यांचा वयक्तिक व खात्यातील निर्णय व कामाचा उरक समाज उपयोगी व राष्ट्र बांधणीसाठी खूप मोठा आहे, हे त्यांनी जगाला दाखून दिले आहे. गडकरी यांनी गेल्या दहा वर्षात त्यांनी करून दाखविलेल्या कामाची पावती त्यांना मिळाली व परत केंद्रात तिसर्‍यांदा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून कार्यरत झाले आहेत.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या