बार्सिलोना –
फुटबॉल क्लब बार्सिलोनाने स्पॅनिश लीगमध्ये ऍटलेटिकोविरूद्ध झालेल्या सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली. यावेळी बार्सिलोनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने कारकिर्दीतील ७०० वा गोल नोंदवला. मंगळवारी कॅम्प नाऊ येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात मेस्सीने ही कामगिरी केली.
बार्सिलोनाकडून खेळताना मेस्सीचा हा ६३० वा गोल होता. मेस्सीने १ मे २००५ रोजी बार्सिलोनासाठी पहिला गोल केला होता. २०१२ मध्ये मेस्सीने ९१ गोल केले होते. या गोलसह त्याने ब्राझीलचे दिग्गज फुटबॉलपटू पेले यांचा वर्षातील ७५ गोलचा विक्रम मोडित काढला.
मेस्सी खूप महत्वाकांक्षी आहे. त्याच्या पुढेही अनेक गोल आहेत. संघासाठी सर्वाधिक गोल नोंदवताना पेलेचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी १३ गोलची आवश्यकता आहे. क्लबसाठी त्याने ७२४ सामने खेळले. जावी हर्नांडेझच्या ७६७ सामन्यांपर्यंत पोहोचण्यास मेस्सीला फर काळ लागणार नाही‘, असे बार्सिलोनाने म्हटले आहे. मेस्सीचा बार्सिलोनाशी २०२१ पर्यंत करार आहे.