Thursday, September 12, 2024
Homeमुख्य बातम्याRain Update : राज्यात मुसळधार पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने दिली 'ही'...

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

मुंबई | Mumbai

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुफान बॅटिंग करुन गेलेला पाऊस (Rain) ऑगस्ट महिन्यात काहीसा गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत उघडझाप पाऊस बरसत असून काही जिल्ह्यांत मात्र पाऊस गायब झाल्याने शेतकरी (Farmer) चिंतेत सापडला आहे. अशातच आता हवामान विभागाने राज्यात पाऊस पुन्हा कधी कोसळणार याबाबत माहिती दिली आहे…

- Advertisement -

Eiffel Tower : प्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’ बॉम्बने उडवण्याची धमकी

याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार नाही. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह (Maharashtra) पश्चिम आणि दक्षिण भारतात मोठ्या पावसाच्या शक्यतेचे प्रमाण कमी असणार आहे. त्यानंतर राज्यात १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; दोघे काय बोलणार? अवघ्या राज्याचे लक्ष

तसेच २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राज्यातील विदर्भ आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Madhya Maharashtra and Marathwada) सरासरी इतका किंवा त्यापेक्षा कमी पावसाचे प्रमाण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या आठवड्यात पावसाचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Shirdi : सलग सुट्ट्यांमुळे दुमदुमली शिर्डी, साईंच्या दरबारी भाविकांची तुफान गर्दी

- Advertisment -

ताज्या बातम्या