Monday, June 17, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली 'ही' महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान विभागाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

मुंबई | Mumbai

- Advertisement -

अर्धा जून महिना (Month of June) उलटून गेला तरी राज्यात मान्सून (Monsoon) सक्रीय झालेला नाही. सामान्यपणे मान्सून केरळमध्ये १ जूनपर्यंत पोहोचतो. मात्र यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी एक आठवडा उशिर झाला. तर दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळाचा (Cyclone Biparjoy) मोठा फटकाही मान्सूनच्या वाटचालीला बसला. यामुळे मान्सूनची प्रगती मंदावल्याने पेरण्या देखील रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अशातच आता मान्सूनबाबत हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे…

याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून ८ जूनला केरळमध्ये (Kerala) दाखल झाला होता. पंरतु, बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका मान्सूनला बसल्याने पाऊस (Rain) लांबणीवर गेला. त्यामुळे आता पुढील ७२ तासांत मान्सून उर्वरीत महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच ११ जून रोजी मान्सून कोकणात दाखल झाला होता. मात्र, बिपरजॉय चक्रीवादळामुळे त्याची पुढील वाटचाल बिघडली. पंरतु, आता बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्याने मान्सूनसाठी राज्यात अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पुढील ७२ तासांत मान्सून महाराष्ट्रातील (Maharashtra) मुंबई, पुणे, दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि इतर प्रदेश व्यापण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर २३ जूनपासून मान्सून आणखी सक्रिय होईल असेही हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच सध्या राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र, हा पाऊस मान्सूनचा नसून चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झाल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या