Saturday, January 24, 2026
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! मान्सून केरळात दाखल; हवामान विभागाची माहिती

मोठी बातमी! मान्सून केरळात दाखल; हवामान विभागाची माहिती

महाराष्ट्रात कधी?

मुंबई | Mumbai

देशातील अनेक शहरांचे तापमान (Monsoon) ४२-५० डिग्री पार झाले आहे. वाढता उकाडा व तापमानामुळे हैराण असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून केरळच्या (Kerala) किनारपट्टीत दाखल झाला आहे. मान्सूनच्या या आगमनामुळे बळीराजासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन १० किंवा ११ जून रोजी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने (Meteorological Department) दिली आहे.

- Advertisement -

प्राथमिक अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये ३१ मे रोजी धडकण्याची शक्यता होती. पण, तो वेगाने पुढे येत राहिल्याने आजच तो केरळमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान मान्सूनच्या आगमनानंतर देशात म्हणजेच ३१ मे पासून उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. तर येत्या काही दिवसांत अरबी समुद्रातून (Arabian Sea) वारे वाहू लागल्याने तापमानातही काही अंशांची घट अपेक्षित असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राआधी (Maharashtra) मान्सून कर्नाटकात प्रवेश करणार असून त्यासाठी ६ किंवा ७ जूनची तारीख वर्तवण्यात येत आहे.

YouTube video player

हवामान विभागाच्या पुर्वानुमानानुसार राज्यात १० ते ११ जूनदरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, मुंबईपासून मान्सूनची सुरुवात होणार आहे. त्यानंतर १३ ते १४ जूनपर्यंत मान्सून बंगळुरूपर्यंत मजल मारेल असे सांगण्यात येत आहे. उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून उष्णता इतकी वाढली आहे की घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये पारा वाढला आहे. उष्णतेचा कहर सुरूच आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.

तसेच पुढील काही आठवड्यांत मध्य आणि उत्तर भारतालाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. तर बुधवारी हवामान खात्याने अंदाज वर्तवला की, मान्सून केरळकडे सरकत आहे, जो आतापर्यंत मालदीवच्या आसपास होता तो आता केरळकडे सरकत आहे. त्यानंतर मग तो उत्तर पूर्व राज्यांकडे सरकणार आहे. तसेच उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यासाठीही हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे.

दरम्यान आजपासून म्हणजेच (दि. ३० मे) पासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होणार आहे. हवामान खात्याने म्हटले की, पुढील एका आठवड्यात ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल. त्रिपुरा,मिझोराम, मणिपुर, नागालैंड, आसाम आणि मेघालयमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सिक्कीम आणि बंगालमध्येही हवामान बदलणार आहे. या राज्यात पुढील दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच बंगाल, झारखंड, बिहार व्यतिरिक्त ओडिशामध्ये ३१ मे ते २ जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळ येण्याचीही शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यामध्येही हवामान बदलणार आहे. तर डोंगराळ भागात हलका पाऊस पडू शकतो.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...