Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra Rain Update : राज्यात पुन्हा कोसळणार धो-धो पाऊस; हवामान विभागाकडून 'या'...

Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा कोसळणार धो-धो पाऊस; हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

मुंबई | Mumbai

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाने (Rain) थोडीशी उघडीप दिल्याचे चित्र दिसत आहे. तर काही ठिकाणी पाऊस मात्र गायबच झाला आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) देखील चिंतेत सापडला आहे. अशातच आता हवामान विभागाने पुढील ५ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे…

- Advertisement -

याबाबत हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेश किनार्‍यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून आज ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश (Bangladesh) किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. तर पुढील २४ तासांत पश्चिम बंगालमधील (West Bengal) गंगा नदीचे खोरे ओलांडण्याची शक्यता आहे.

Nashik Crime News : क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची ‘इतक्या’ लाखांची फसवणूक

त्यामुळे याचा परिणाम थेट राज्यातील हवामानावर होणार असून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्याबरोबरच आज सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून याठिकाणी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. तर पुणे, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी आणि मुंबईसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच उद्या म्हणजेच बुधवार (दि. ०२ ऑगस्ट) रोजी मुंबई, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसणार असून या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात (Yellow Alert) आला आहे.

Sinnar Crime News : तडीपार गुंडाच्या पोलिसांनी राहत्या घरातून आवळल्या मुसक्या; कुटुंबियांनी चार तास केला प्रतिकार

तर गुरूवार (दि. ०३ ऑगस्ट) रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला असून शुक्रवार (दि. ०४ ऑगस्ट) रोजी मुंबई, पालघर, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याने माझी जबाबदारी आणखी वाढली – पंतप्रधान मोदी

दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळला तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पाहायला मिळाला आहे. पंरतु, ऑगस्ट महिना हा अधिकाधिक प्रमाणात कोरडा जाण्याची शक्यता आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने पुढील दोन महिन्यांसाठी पावसाचा अंदाज जाहीर केला असून या दोन महिन्यांमध्ये देशात मान्सून सामान्य राहिल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Samruddhi Mahamarg Shahapur Accident : दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश

- Advertisment -

ताज्या बातम्या