Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पुन्हा मुसळधार; ऑगस्ट-सप्टेंबरचा अंदाज हवामान विभागाकडून सादर

राज्यात पुन्हा मुसळधार; ऑगस्ट-सप्टेंबरचा अंदाज हवामान विभागाकडून सादर

मुंबई | Mumbai

राज्यात जुलैमध्ये जोरदार पाऊस (Rain) बरसला. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती (Flood) निर्माण झाली होती. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात पावसाने जुलैत जोरदार हजेरी लावली होती….

- Advertisement -

आता हवामान विभागाकडून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन महिन्यात समाधान सरासरीपेक्षा १०६ टक्के पाऊस होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने (IMD) दिली आहे.

कोकणात सर्वसाधारण, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर सरासरीपेक्षा जास्त राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

देशभरात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्य पाऊस पडेल. ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता असून पश्चिम मध्य भारत, उत्तर पश्चिम भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पूर्व मध्य, पूर्वेत्तर भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण भारतीय राज्यात मात्र उर्वरित राज्यापेक्षा अतिवृष्टी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या