म्हसावद | वार्ताहर- MHASAVAD
म्हसावद पोलीसांनी (police) अवैधरित्या विदेशी मद्य (liquor) भरुन जाणारी बोलेरो पिकअप (Bolero pickup) पकडली. या पिकअपमध्ये ५ लाख २८ हजार रुपये किमतीचा विदेशी मद्य आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे.
तळोदा येथील कॉंग्रेसचे नगरसेवक गौरव वाणी, सुभाष चौधरी यांचा भाजपात प्रवेश
याबाबत अधिक माहिती अशी की, काल दि.३ नोव्हेंबर रोजी दुपारी म्हसावद पोलीसांनी एक बोलेरो पिकअप वाहन (क्र. क्र.एमएच-१४-सीपी-४०९२) या वाहनात अवैधरित्या विदेशी दारु भरुन शहादा, वडगांव जावदा तह मार्गे भमराटा नाक्याकडे जात असताना पकडली.
या वाहनात ५ लाख २८ हजार रुपये किमतीचे खाकी रंगाचे पुठ्याचे एकुण २०० बॉक्स, सोम पॉवर १०००, सुपर स्ट्रॉंग बियर स्टोन, असा मद्यसाठा आढळून आला. या मालाबाबत वाहन चालक कोमलसिंग तारसिंग भिल (४५ ) रा. पळासनेर ता. शिरपूर जि.धुळे यास सदर मालाबाबत विचारपूस केली असता तयाने उडवाउडवीची उत्तरे दिली.
मालाचा परवाना व माल वाहतुकीचा परवाना सादर केला नाही. परिणामी अवैधपणे दारु वाहतूक करीत असल्याबाबत खात्री झाल्याने म्हसावद पोलीस ठाण्यात महा.दा.का. कलम ६५ (३) १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिकअप वाहनासह एकुण १० लाख २८ हजार रुपये दारु व वाहनासह जप्त करण्यात आले आहे. याकामी पो.कॉ.घनश्याम सूर्यवंशी, अजित गावित, प्रल्हाद राठोड, राकेश पावरा, उमेश पावरा यांनी कार्यवाही केली. पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक अजित गावित करीत आहेत.
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ…