Sunday, June 30, 2024
Homeक्राईमNashik Crime News : स्वयंघोषित भाईचे पंटर जेरबंद

Nashik Crime News : स्वयंघोषित भाईचे पंटर जेरबंद

म्हसरूळ गुन्हे शोध पथकाची कामगिरी

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

- Advertisement -

म्हसरूळ (Mhasrul) येथील टपरीवर राडा करणाऱ्या स्वयंघोषित भाईच्या दोन पंटरांना जेरबंद करण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे.या संशयितांकडून एक तलवार, एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात (Mhasrul Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

हे देखील वाचा : नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ येथील बस स्टॉप (Bas Stop) येथे भूषण देशमुख (वय ३१, मार्गारेट टॉवर, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोड) यांचे गणेश पान स्टॉल आहे. मंगळवारी (दि.२५) रोजी सायंकाळी सहा वाजता भुषणचा भाऊ पान स्टॉलवर असताना युवराज सोनवणे नामक व्यक्तीच्या नावाने तीन चार तंबाखूच्या पुड्या मागितल्या होत्या. त्यावेळी हर्षल याने बाहेर असलेल्या भाऊ भूषण यास फोन करून यासंदर्भात सांगितले, यावर चिडून चार पुड्या नाही पुडा च दे असा बोलला. रात्री आठ वाजता भूषण देशमुख हा स्वतः पान स्टॉलवर असताना दोन संशयितांनी तलवारी घेऊन दहशत निर्माण करत काऊंटरवर आपटली आणि तु बाहेर ये तुझा गेम करून टाकतो, युवराज भाईला शिव्या देतो असे म्हणत पान स्टॉलचे नुकसान करून फरार झाले होते.

हे देखील वाचा : Rain Update News : राज्यात पुढील चार दिवस पावसाचे

त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ गुन्हे शोध पथकाने (Mhasrul Crime Investigation Team) घटनास्थळी धाव घेतली.या ठिकाणी असलेले सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने यातील दोन्ही संशयित तवली फाटा येथे लपून असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने म्हसरूळ पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून संशयित वैभव रामचंद्र शेवरे (वय २२ ), व सिध्दार्थ उर्फ सिध्दू पुंजाराम वाघ (वय २२) दोघे रा. म्हसोबावाडी, दिंडोरीरोड, म्हसरूळ, नाशिक यांना ताब्यात घेण्यात आले.

हे देखील वाचा : Nashik Niphad News : सोनेवाडीत विवाहितेची आत्महत्या

दरम्यान, ही कारवाई पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (Sandeep Karnik) परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण पंचवटी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे, पोलिस उपनिरीक्षक दिपक पटारे, उध्दव हाके, पोलिस हवालदार बाळासाहेब मुर्तडक, सतिष वसावे, कविश्वर खराटे, देवराम चव्हाण, प्रशांत वालझाडे, पोलिस अंमलदार प्रशांत देवरे, गिरीधर भुसारे, गुणवंत गायकवाड, पंकज महाले यांनी केली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या