Friday, July 12, 2024
Homeनाशिकएमएचटी-सीईटी २०२१ चा निकाल जाहीर

एमएचटी-सीईटी २०२१ चा निकाल जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र कृषी अभ्यासक्रमाच्या Engineering, Pharmacology Agricultural Courses प्रवेशासाठी admissionsआवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटी २०२१ चा निकाल MH CET Result 2021 जाहीर करण्यात आला आहे. यात पीसीबी गटात संयुक्त रित्या नाशिकचा मोहित पाटील राज्यात पहिला आला आहे. त्याला १०० टक्के पर्सनटेज मिळाले आहेत.

दरम्यान सीईटी साठी नोंदणी केलेल्या ५ लाख ४ हजार ८३५ उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४लाख १४ हजार ९६८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १ लाख ९२ हजार ०३६ विद्यार्थ्यानी पीसीएम तर २ लाख २२ हजार ९३२ विद्यार्थ्यानी पीसीबी गटा साठी परीक्षा दिली होती. त्यातील

महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्हांच्या ठिकाणी २२७ परीक्षा परीक्षाकेंद्रावर ऑनलाईन पध्दतीने १३ दिवसांत २६ सत्रामध्ये घेण्यात आली.

यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी २०२१ या परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे अभियांत्रिकी अभ्यासक्रम, औषधनिर्माणशास्त्र व कृषी विधायक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला जाईल. उमेदवारांना त्यांचा निकाल त्यांच्या लॉगिन मधून www.mahacet.org किंवा https://mhtoet2021.mahacet.org या संकेतस्थळावर वरून स्कोअर कार्ड डाऊनलोड करता येईल.

उमेदवारांची नोंदणी

पीसीएम- २२८००३

पीसीबी- २७६८३२

एकूण -५०४८३५

परीक्षेस बसलेले उमेदवार

पीसीएम-१९२०३६

पीसीबी- २२२९३२

एकूण-४१४९६८

परीक्षेस न बसलेले उमेदवार

पीसीएम-३५९६७

पीसीबी-५३९००

एकुण -८९८६७

उपस्थितांची टक्केवारी

पीसीएम- ८४.२३

पीसीबी- ८०.५३

एकूण-८२.२०

अनुपस्थितांची टक्केवारी

पीसीएम-१५.७७

पीसीबी- १९.४७

एकूण- १७.८०

- Advertisment -

ताज्या बातम्या