Wednesday, June 26, 2024
Homeब्रेकिंग न्यूजएमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर

एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर

पुणे । वृत्तसंस्था Pune

- Advertisement -

अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या राज्य समाइक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल आज जाहीर करण्यात आला. सीईटी सेलने याबाबत माहिती दिली.

एमएचटी सीईटी परीक्षा 22 एप्रिल ते 16 मे 2024 या कालावधीत घेण्यात आली. राज्यभरातील 159 केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यातील 16 परीक्षा केंद्रे राज्याबाहेरील होती. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यचा (जेईई मेन्स) निकाल या पूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लागले होते.

एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या