Sunday, October 11, 2026
HomeनगरAhilyanagar : मायक्रोसॉफ्ट टीम्सवर बनावट खाते तयार करून एक कोटींचा गंडा

Ahilyanagar : मायक्रोसॉफ्ट टीम्सवर बनावट खाते तयार करून एक कोटींचा गंडा

कंपनीच्या डिव्हीजन प्रेसिडेंट नावाने एचआर मॅनेजर व वरिष्ठ लेखापालाला जाळ्यात ओढले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कंपनीच्या डिव्हीजन प्रेसिडेंट नावाने मायक्रोसॉफ्ट टीम्सवर बनावट खाते तयार करून कंपनीच्या एचआर मॅनेजर आणि वरिष्ठ लेखापालाला एक कोटी रुपये पाठविण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट खात्याद्वारे पाठविण्यात आलेल्या बँक खात्यावर कंपनीकडून एक कोटी रुपये वर्ग करण्यात आले. या प्रकारात कंपनीची एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

- Advertisement -

समीर शरद पळसकर (वय 46, रा. सावेडी, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 8 ऑक्टोबर 2026 रोजी संबंधित अनोळखी व्यक्तीने कंपनीचे डिव्हीजन प्रेसिडेंट सुनील मुरलीधरन यांच्या नावाने मायक्रोसॉफ्ट टीम्सवर बनावट खाते तयार केले. त्यानंतर कंपनीचे एचआर मॅनेजर शैलेंद्र खळदकर आणि वरिष्ठ लेखापाल सुयोग भनसाळी यांना या ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. बनावट खात्याद्वारे आपणच कंपनीचे डिव्हीजन प्रेसिडेंट असल्याचे भासवून संबंधित व्यक्तीने ग्रुपवर एका बँक खात्याचा क्रमांक पाठविला.

या खात्यावर एक कोटी रुपये पाठविण्यास दोघांना भाग पाडण्यात आले. संबंधित व्यक्तीने वरिष्ठ पदावरील अधिकार्‍याच्या नावाचा वापर केल्यामुळे कंपनीतील कर्मचार्‍यांचा विश्वास संपादन करून ही फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी 9 ऑक्टोबर रोजी नगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अज्ञात व्यक्ती व संबंधित बँक खातेधारकाविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर पोलीस निरीक्षक सागर ढिकले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : खरिपाच्या करपलेल्या पिकांचे 73 टक्के पंचनामे पूर्ण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar खरीप हंगाम 2026 मध्ये ट्रिगर-1 लागू झालेल्या नगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये बाधित पिकांचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाकडून वेगाने सुरू आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत...