Saturday, November 9, 2024
Homeनगरएमआयडीसी पोलिसांचे भल्या पहाटे सर्च ऑपरेशन

एमआयडीसी पोलिसांचे भल्या पहाटे सर्च ऑपरेशन

वॉरंट मधील 10 जणांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वरिष्ठांच्या आदेशाने एमआयडीसी पोलिसांनी काल, गुरूवारी भल्या पहाटेच सर्च ऑपरेशन राबवून अटक वॉरंट मधील 10 आरोपींना अटक केली. तसेच 17 बेलेबल वॉरंट व 34 न्यायालयीन समन्सची बजावणी केली. पहाटे पाच ते सकाळी आठ यावेळेत ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एमआयडीसी हद्दीत सर्च ऑपरेशन राबविण्याचे आदेश एमआयडीसी पोलिसांना दिले होते.

- Advertisement -

सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी वेगवेगळी पथके तयार करून गुरूवारी पहाटे पाच ते सकाळी आठ या वेळेत धरपकड करून अटक वॉरंटमधील 10 आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. तसेच 17 बेलेबल वॉरंट व 34 न्यायालयीन समन्सची बजावणी केली. एमआयडीसी पोलिसांच्या धरपकडमुळे आरोपींची एकच धावपळ उडाली. अधीक्षक ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीणचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चौधरी, पोलीस उपनिरीक्षक विनोद परदेशी, उपनिरीक्षक विजय जाधव, उपनिरीक्षक मनोज मोंढे, उपनिक्षक अनिल आढाव, अंमलदार महंमद शेख, संदीप चव्हाण, अनिल आव्हाड, फकीर शेख, मुकुंद दुधाळ, मनोज रजपुत, विष्णू भागवत, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, राजेश राठोड, ज्ञानेश्वर तांदळे, गोरक्षनाथ केदार, रवींद्र देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या