रावेर । प्रतिनिधी
रावेर विधानसभा मतदार संघातील बेरोजगारीचा प्रश्न वाढत आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मतदार संघात उद्योग क्षेत्र वाढले पाहिजे. यासाठी रावेर व यावल या ठिकाणी मिनी एमआयडीसी स्थापन करण्याची गरज आहे. मतदार संघात औद्योगिक क्षेत्र वाढीसाठी भावी काळात या प्रश्नाला प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन रावेर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय चौधरी यांनी दिले.
यावल तालुक्यात सोमवारी प्रचार दौर्यानिमित्त उमेदवार धनंजय चौधरी यांनी युवा मतदारांच्या तसेच नागरिकांच्या भेटी घेतल्या. सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र त्या तुलनेत मतदार संघात रोजगाराच्या संधी फारशा उपलब्ध नाहीत. यापूर्वी पाल ता रावेर येथे मिनी एमआयडीसी स्थापन करण्याचा आमदार शिरीष चौधरी यांनी प्रयत्न केला. मात्र वनविभागाने याला परवानगी न दिल्याने येथे एमआयडीसी होऊ शकली नाही. भावी काळात युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी रावेर व यावल येथे मिनी एमआयडीसी स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन उमेदवार धनंजय चौधरी यांनी दिले.
यावेळी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, शेखर पाटील, जगदीश कवडीवाले, हाजी शब्बीर शेख, भगतसिंग पाटील, कदीरखान, केतन किरंगे, मुकेश येवले, अतुल पाटील, राकेश कोलते, राजू करांडे, हाजी इकबाल खान, इम्रान पहेलवान, युनूस शेठ, अनिल जंजाले, मनोहर सोनवणे, असलम मेंबर, शरद कोळी, संतोष धोबी, पप्पू जोशी, कडू पाटील, हसन तडवी, बारी पंच मंडळाचे अध्यक्ष दगडू बारी, बशीर तडवी, हाजी गफ्फार शाह, संदीप सोनवणे, अजय बढे, कारंज घारु, अरुण लोखंडे, श्री. बोदडे, विक्की गजरे, विवेक अडकमोल, बापू पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.