Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याभुताटकीच्या संंशयातून आदिवासींचे स्थलांतर

भुताटकीच्या संंशयातून आदिवासींचे स्थलांतर

घोटी । वार्ताहर Ghoti

इगतपुरी तालुक्यातील ( Igatpuri Taluka)अतिदुर्गम असलेल्या आदिवासी भागात अजूनही अंधश्रद्धा ( Superstition)मोठ्या प्रमाणावर आहे. याचा प्रत्यय तालुक्यातील धारगाव येथील भोरवाडी ( Bhorwadi )ह्या आदिवासी पाड्यामध्ये आला असून भुताटकीच्या संशयातून आठ आदिवासी कुटुंबानी बिर्‍हाड बांंधून स्थलांतर केले आहे. त्यामुळे हा पाडा सध्या निर्मनुष्य झाला आहे. आदिवासी भागात अंधश्रद्धा जास्तच डोके वर काढत असल्याने या भागात प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, भोरवाडी या पाड्यावर मागील महिन्यात आजारी असलेल्या एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या बालकाला भुताटकीने बाधा केली, असा आरोप करून संबंधित कुटुंबाने इतर आठ कुटुंबांवर संशय व्यक्त केला होता.त्यामुळे त्यांंच्यात रोजच भांंडणे होऊन वाद विकोपालागेला होता.

ही बाब घोटी पोलिसांपर्यंत गेली होती.ही तक्रार गेल्यानंतर पोलिसांनी भोरवाडी पाड्यात सर्व संबंधित आदिवासी कुटुंबियांची समजू काढून अंधश्रद्धा निर्मूलन करत गैरसमज दूर केले होते. मात्र त्या 8 आदिवासी कुटुंबांतील वाद थांबले नव्हते. त्यांच्यात रोजच भांडणे, वाद आणि शिवीगाळ हा प्रकार सुरू होता. त्याला सर्वच जण कंंटाळून गेले होते. हे येथे राहात असल्यामुळेच होत आहे, असा समज करून सर्व आदिवासींनी अखेर घरांची मोडतोड करून बिर्‍हाड बांधून त्यांनी सर्व संसारासह स्थलांंतर केले आहे.या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात चचेर्र्चे काहुर माजले आहे. भोरवाडी पाड्यातील लक्ष्मण धापटे, सोमा शिद, भाऊ पादिर, सनू पादिर, गंगुबाई खडके, शांताराम खडके आणि अन्य दोन अशा आठ कुटुंबांनी गावातून स्थलांतर केले आहे.

प्रशासनाने जनजागृती करावी

अंधश्रद्धेमुळे ग्रामीण आदिवासी भागातील गाव ओस पडत असेल तर ही बाब संतापजनक आहे. तेथे यंत्रणेने जनजागृती करण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी सजग नागरिकांनी केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या