भुसावळ :
मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा या परिसरात सर्रास अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत.आला आहे हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी कु-हा येथील सरपंच सौ.सुनीता विश्वनाथ मानकर व तेजराव पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिसांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा काकोडा परिसरात सट्टा पत्ता दारू मटका गुटका पोलीस दूरक्षेत्राचे हाकेच्या अंतरावर हे अवैध धंदे चालतात याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सरपंच यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कुटुंब उद्ध्वस्त करत आहे.
तसेच बनावट नागमणी, मांडूळ जातीच्या सापाची तस्करी अशे गोरख धंदे बिनबोभाटपणे या परिसरात चालतात त्यामुळे सरित गुन्हेगारी व व परप्रांतीय टोळ्या धारदार शस्त्र सह या परिसरात वावरत असतात अनेक लुटमारीचे प्रकार देखील वाढले आहेत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याकडे मुक्ताईनगर व कु-हा पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे.
या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे सरपंच व एका सदस्यांनी मुक्ताईनगर पोलिसाला निवेदन देऊन केली आहे अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे तसेच निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव, पोलीस महानिरीक्षक नाशिक, नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील, पोलीस विभाग अधिकारी पाठवली आहे.