Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकदेवळाली कॅम्प : लष्करी तळाची हेरगिरी करणारा अटकेत

देवळाली कॅम्प : लष्करी तळाची हेरगिरी करणारा अटकेत

देवळाली कॅम्प | Deolali Camp

भारतीय लष्कराचे प्रमुख प्रशिक्षण केंद्र असलेल्या देवळाली कॅम्प येथील परिसराचे फोटो काढून पाकिस्तानी व्हाट्सएपच्या ग्रुप वर पाठविणाऱ्या युवकांस लष्करी अधिकारी यांनी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

- Advertisement -

सदर बाब हेरगिरीची असू शकते. यामूळे लष्करी अधिकारी व पोलीस सतर्क झाले आहेत

भारतीय लष्करी विभागाचे एअर फोर्स व आर्टिलॅरी हे प्रमुख केंद्र देवळालीत कार्यान्वीत आहेत. त्यात स्कूल ऑफ आर्टिलॅरी मध्ये लष्करी अधिकारी व जवान यांचे प्रशिक्षण चालते.

लष्करी हॉस्पिटल परिसरात काही दुरुस्ती ची कामे सुरू असून त्यासाठी ठेकेदार मार्फत मजूर लावण्यात आले आहेत. त्यातील बिहार येथील व हल्ली देवळाली कॅम्प चिंतामणी नगर येथे राहणारा संशयित संजीव कुमार (२१) या मजुराने परिसराचे फोटो मोबाईल मध्ये काढले.

याबाबत अधिकारी व जवान यांना शंका येताच त्यांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईलची पाहणी केली असता पाकिस्तानच्या व्हाट्सएपच्या ग्रुप वर फोटो पाठविल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे सदर बाब गंभीर असल्याने सुभेदार ओमकुमार यादव यांनी देवळाली कॅम्प पोलीस कडे तक्रार नोंदवून संशयित संजीव कुमार यास देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी संशयित संजीव कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उद्या त्यास (दि.०४) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

याबाबत पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि राहुल मोरे पुढील तपास करीत आहेत. यापूर्वी देखील देवळाली लष्करी परिसरात अशा हेरगिरी व रेकी च्या घटना घडल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या