Friday, April 25, 2025
Homeनगरदूध भेसळ : राहुरी, कोपरगाव आणि कर्जतमध्ये कारवाई

दूध भेसळ : राहुरी, कोपरगाव आणि कर्जतमध्ये कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरच्या दूध भेसळ प्रतिबंधक समितीच्यावतीने राहुरी, कोपरगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील सुमारे 11 दूध संकलन केंद्रावर धडक कारवाई केली. त्यात काही केंद्रावरील तपासणीसाठी दुधाचे नमुने घेण्यात आले. काही ठिकाणी भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दूध भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

28 जुलै रोजी राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथील जगदंबा दूध संकलन केंद्र, जगदंबा माता दूध संकलन केंद्र येथील गायीच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर शिलेगावातील पतंजली दूध संकलन केंद्राची पथकाने पाहणी केली. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी पी.बी. पवार, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. पालवे व जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने यांनी केली.

1 ऑगस्ट रोजी कोपरगावातील साई अमृत दूध संकलन केंद्र, धोंडेवाडी येथील नारायणगिरी दूध संकलन केंद्र, जवळके येथील प्रशांत भागवत शिंदे यांच्या गोठ्यात कारवाई करण्यात आली. या सर्व ठिकाणचे दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी बडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीष सोनोने यांनी केली. 4 ऑगस्ट रोजी कर्जत तालुक्यातील कृष्णाई दुध शितकरण केंद्र येथील दुधाचे नुना घेयातअ ाला तसेच 1200 लीटर दुध नष्ट करण्यात आले. तसेच जामखेड तालुक्यातील खर्डा येथील भगवान कृपा दुध संकलन केंद्रात दुधाचे नमुने घेण्यात येऊन 3800 लीटर दुध नष्ट करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील कृष्णाई दुध शितकरण केंद्र, जगदंबा दुध संकलन व शितकरण केंद्र, दूरगाव येथील साईबाबा दुध शितकरण केंद्र, अन्वेषा दुध संकलन केंद्र, मिरजगावातील गजानन महाराज मिल्क व प्रोडक्टस, कुळधरण येथील त्रिमूर्ती दुध संकलन केंद्र, कर्जत येथील सदगुरू मिल्क व प्रोडक्टस, बहिरोबावाडीतील नागराबाई यादव दुध संकलन केंद्र, मिरजगाव येथील अ‍ॅग्रोवन मिल्क प्रोडक्टस येथील दुधाचे नमूने घेण्यात येवून दूध नष्ट करण्यात आले.. गजानन महाराज मिल्क व प्रोडक्टसचे 4200 लीटर दूध नष्ट करण्यात आले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Pune News : पुण्यात १०० हून अधिक पाकिस्तानी नागरिक

0
पुणे (प्रतिनिधी) पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सध्या एकूण १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. ५६ महिला आणि ३५ पुरुष दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत, अशी माहिती...