Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकMilk : राज्यात दुध भेसळ रोखण्यासाठी मोहीम सुरू

Milk : राज्यात दुध भेसळ रोखण्यासाठी मोहीम सुरू

ओझे l विलास ढाकणे Oze

आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. परंतु सद्यस्थितीत दुधातील भेसळीचे प्रकार राज्यात निदर्शनास येत आहेत. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ ची अंमलबजावणी करुन राज्यातील नागरिकांना सकस व निर्मळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्याबाबत विविध उपाययोजना करीत आहे.

- Advertisement -

दूध/दुग्धजन्य अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर जरब बसण्याकरिता व भेसळ रोखण्याकरिता तसेच राज्यातील जनतेस उपलब्ध होणाऱ्या दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदय तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, व आयुक्त राजेश नार्वेकर यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात दूध या अन्नपदार्थाची सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली.

YouTube video player

या मोहिमेअंतर्गत एकाचवेळी राज्यभरातील विविध ठिकाणांहून दूधाचे सर्वेक्षण नमुने घेऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी एकूण १०३ अन्न सुरक्षा अधिकारी यांना सर्वेक्षण नमुने घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज सकाळी ५.०० वाजलेपासून राज्यभरातील अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दूध उत्पादक, वितरक, विक्रेते व रस्त्यावरील विक्री केंद्रांवरून एकूण १०६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले असून त्यापैकी राज्यात विक्री होणाऱ्या विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच / पिशवी पॅकिंग मधून व ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचे आहेत.

सदर नमुने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठवून भेसळ, रसायनांचे प्रमाण व दूधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल. सदर सर्वेक्षण नमुने विश्लेषणांती दुधाच्या नमुन्यामध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ सदर आस्थापनेमधून कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादक व पुरवठादार यांचेवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनामार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याविषयी बोलताना सांगितले की, “दूधातील भेसळ ही गंभीर समस्या आहे. नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी मुख्यमंत्री तसेच विभागाचे मंत्री राज्यमंत्री यांनी दूध भेसळ हा विषय गांभीर्याने घेतला असून भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगे आज राज्यभरामध्ये दुधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.

सदर नमुन्यामध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ संबंधित दुधाचे विक्रेते. पुरवठादार व उत्पादक यांचेविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच अशाप्रकारच्या मोहिमा वारंवार घेण्यात येतील.

नागरिकांनी दूध किंवा अन्नपदार्थामध्ये भेसळ दिसल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या हेल्पलाइन क्रमांक [१८००२२२३६५] वर त्वरित संपर्क साधावा किंवा jc-foodhq@gov.in या ईमेल वर किंवा https://foscos.fssai.gov.in/consumergrievance या पोर्टलवर तक्रार नोंदवावी.”

ताज्या बातम्या

Malegaon MC Election : उमेदवारांच्या मांदियाळीने निवडणुकीत चुरस; स्वपक्षीय बंडखोर-अपक्षांमुळे यशासाठी...

0
मालेगाव | हेमंत शुक्ला | Nashik शहरातील राजकीय प्रभुत्व सिध्द करण्यासाठी महानगरपालिका (Mahapalika Election) सभागृहात प्रवेशासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात पुन्हा उडी...