Saturday, July 27, 2024
Homeनगरअकोले, राहुरी, नगर आणि कर्जतमध्ये दूध प्रकल्पांची तपासणी

अकोले, राहुरी, नगर आणि कर्जतमध्ये दूध प्रकल्पांची तपासणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या आदेशानुसार जिल्ह्यातील दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने दूध संकलन केंद्रासह दूध प्रकल्पांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेत अन्न औषध प्रशासनाने अकोले, राहुरी, नगर आणि कर्जत तालुक्यातील दुधाचा संशय असल्याने 12 नमुने तपासणीसाठी घेतले असून नगर आणि कर्जत तालुक्यातील एकूण 540 लिटर दूध नष्ट केले आहे.

- Advertisement -

राज्य सरकारच्या सुचनेनंतर अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या आदेशानुसार नगरच्या अन्न औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील दूध संकलन केंद्र आणि प्रकल्पांची तपासणी सुरू केली आहे. चार पथकांच्यावतीने जिल्ह्यात 15 सप्टेंबरपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. अन्न औषध प्रशासनासह दुग्धविकास विभागाचे अधिकारी या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत. या तपासणी पथकाने राहुरी तालुक्यातील उंबरे गावात दूध संकलन केंद्रास भेट देऊन त्याठिकाणी तपासणी केली.

याठिकाणी संशय आल्याने येथील केंद्रातील दुधाचा नमुना घेण्यात आला आहे. यासह अकोले तालुक्यातील 3 केंद्राचे, नगर तालुक्यातील देहेरे गावातील दोन केंद्रातील प्रत्येक एक प्रमाणे दोन नमुने, नगरच्या एमआयडीसी भागातील दूध प्रकल्पाचा एक नमुना आणि कर्जत तालुक्यातील विविध केंद्रातील पाच असे एकूण 12 ठिकाणचे दुधाचा संशय आल्याने नमुने घेवून ते तापसणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. यासह नगर तालुक्यातील देहेरे गावात 300 लिटर आणि कर्जत तालुक्यात 240 लिटर असे 540 लिटर दुधाचा अंबूस वास येत असल्याने ते नष्ट करण्यात आले. अन्न औषध विभागाची ही तपासणी मोहिम येत्या 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

तपासणीपूर्वी फोनाफोनी सुरू

जिल्ह्यात अन्न औषध विभागाने दूध संकलन केंद्र आणि प्रकल्पाची तपासणी मोहीम सुरू करताच तपासणी पथक दाखल होण्याआधीच दूध संकलन केंद्र चालक एकमेकांना फोन अथवा मोबाईलवरून संपर्क करत सावध करत आहेत. यामुळे तपासणी पथकाच्या अडचणी वाढल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या