पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील ग्रामपंचायत गाळ्यामध्ये असलेल्या शिवाई दूध डेअरीच्या मागील खिडकीतून अज्ञाताने दगड मारून नुकसान केले आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडला. पिंपरी जलसेन येथे गावात रमाकांत कदम हे दूध संकलन करून दूध शितकरण करतात.
शुक्रवारी रात्री अज्ञात इसमाने त्यांच्या डेअरीच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीतून दगड आतील बाजूस फेकून आतमध्ये असणार्या मशीनची तोडफोड करून नुकसान करण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीमुळे आतमध्ये टाकीत असलेले दूध व त्याठिकाणी असलेल्या कॉम्प्रेसरचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. पाण्याच्या टाकीमधून पाणी देखील सोडून देण्यात आले. हा सर्व प्रकार शनिवारी सकाळी 6 च्या सुमारास कदम यांनी डेअरीचे दरवाजा उघडल्यानंतर लक्षात आला. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर निघोज पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश डहाळे तपास करत आहेत.