Saturday, October 5, 2024
Homeनगरदुधाला तातडीने प्रति लिटर ४० रूपये दर द्या; कोपरगाव-संगमनेर मार्गावर रास्ता रोको...

दुधाला तातडीने प्रति लिटर ४० रूपये दर द्या; कोपरगाव-संगमनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन

रांजणगाव देशमुख । वार्ताहर

दुधाला स्वतंत्र न्यायधीकरणाची स्थापना करून (एम.एस.पी) किमान आधारभुत किंमत ठरवून त्याबाबतचा कायदा करावा. अन्न व भेसळ प्रतिबंधक कायद्यात दुरूस्ती करून त्यामध्ये जामीन न मिळणे सह जास्तीत जास्त शिक्षेची तरतुद करावी.

- Advertisement -

३.५ फॅट व ८.५ एस एन एफ गुणवत्तेच्या दुधाला किमान ४० रूपये प्रती लिटर दर तातडीने देण्याची अंबलबजावणी करावी यासह इतर मागण्यासाठी कोपरगाव-संगमनेर रस्त्यावर जवळके येथे दुध उत्पादक शेतक-यांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी चारही बाजुने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मध्यस्थीने रस्तारोको आंदोलन स्थगीत करण्यात आले.

यावेळी बोलतांना अॅड योगेश खालकर म्हणाले, चाऱ्याचे व पशुखाद्याचे दर गगनाला भिडलेले आहेत. सध्या दुधाला मिळत असलेला दर शेतकऱ्यांना परवडत नाही. १५ मार्च २४ च्या शासन निर्णयाची अंबलबजावणी करून ५ जानेवारी २४ पासुनचे शासनाकडे प्रलंबित असलेले प्रती लिटर ५ रूपये अनुदान दुध उत्पादकांनी उत्पादित केलेल्या सर्व दुधास विना निकष सरसगट मिळावे. तसेच खते कीटकनाशके व शेती उपयोगी साहित्यावरील जी एस टी पूर्णपणे माफ करण्यात यावा.दुधाला कमीतकमी ४० रुपये भाव मिळावा. सध्या आंदोलन स्थगीत करत आहे. शासनाने लवकर यावर निर्णय न घेतल्यास पुन्हा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही खालकर यांनी यावेळी दिला.

अॅड रमेश गव्हाणे म्हणाले, शासन दुग्धउत्पादक शेतक-यांकडे दुर्लक्ष करत आहे.दुधापासुन बनना-या वस्तुंना भाव पण दुधाला भाव नाही हे दुर्देव आहे.शासनाने दुग्धउत्पादक शेतक-याकडे सकारात्मकतेने पहावे.

यावेळी शेतक-यांनी रस्त्यावर दुध ओतुन निषेध व्यक्त केला. हा रास्ता रोको चाळीस मिनिटे चालला. यावेळी लक्ष्मण थोरात, रंगनाथ गव्हाणे, परभत गव्हाणे, विजय गोर्डे,रामनाथ पाडेकर,,सुनिल थोरात, रामनाथ गव्हाणे, कैलास गव्हाणे, शैलेश खालकर, रविंद्र कुरकुटे, श्रीहरी थोरात, सुनिल घारे, अशोक नेहे, रविंद्र पाडेकर, भास्कर पाचोरे, बजरंग गव्हाणे आदिसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या