Thursday, June 13, 2024
Homeनगरदूध उत्पादन घटल्याने उत्पादक हवालदिल

दूध उत्पादन घटल्याने उत्पादक हवालदिल

करजगाव |वार्ताहर| Karajgav

- Advertisement -

सध्या असह्य अशा उन्हाच्या कडाक्याने मानवाबरोबरच पशु-पक्षी, जनावरेही हवालदिल झाली आहेत. गेल्या महिनाभरापासून उन्हाचा पारा चाळीशी पार झाल्यामुळे वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे. जनावरांच्या दूध उत्पादनावरही उन्हाचा परिणाम झाला असून दूध उत्पादन घटल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तीव्र उन्हामुळे माणसाच्या अंगाची लाहीलाही होत असताना, जनावरांवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे दुधाच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसते आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुध व्यवसाय करतात. अगोदरच दुधाचे भाव पडल्याने दूध व्यावसायिक मेटाकुटीला आलेला असराना उष्णतेने गायींचे दुध कमी झाल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

उन्हापासून बचावासाठी दूध देणार्‍या म्हशी व गायींसाठी अनेकांनी झाडाखाली निवारे केले आहेत. गोठा व शेडमध्ये काही शेतकर्‍यांनी पशुधनासाठी पंखेही बसविल्याचे दिसते आहे. कडाक्याच्या उन्हामुळे गायी, म्हशी, वासरांना धाप लागणे, ताप येणे यासारखे आजार वाढत असून याचा परिणाम चारा खाण्याबरोबर दुधाच्या उत्पादनावरही झालेला दिसून येत आहे.
पशुखाद्याचे वाढते दर तसेच पाणी व हिरव्या चार्‍याची कमतरता, यामुळे दुधाचा जमा-खर्च जुळताना दिसत नाही. कडक उन्हाळ्यामुळे दुधाच्या उत्पादनातही मोठी घट झाल्याचे मुळा परिसरातील दूध उत्पादक सांगत आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करत आहे.वातावरणातील बदलामुळे व तापमान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जनावरे चारा कमी खात आहे. याचा परिणाम दूध उत्पादनावर होत असून त्यात दुधाचे भाव कमी झाल्यामुळे खर्च फिटणेसुद्धा अवघड होत आहे.
– महेश टेमक दूध उत्पादक, करजगाव

जनावरांना सावलीत बांधावे. दिवसभरात हिरवा चारा, तसेच वाळलेल्या चारा टाकावा तसेच तीन-चार वेळेस पाणी पाजावे. जनावरांच्या अंगावर पाणी फवारणे यासारखे उपाय करून उन्हापासून जनावरांचे संरक्षण करण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी करताना दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या