Tuesday, March 11, 2025
HomeनाशिकNashik News : वालदेवी नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळले

Nashik News : वालदेवी नदीत लाखो मासे मृतावस्थेत आढळले

नेमकं कारण काय?

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील वालदेवी नदीत (Valdevi River) लाखो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जवळपास दोन किलोमीटरच्या नदीतील परिसरात हे मासे मृत अवस्थेत आढळून आले असून महानगरपालिकेची (Nashik NMC) ड्रेनेज लाईन फुटल्याने दूषित पाण्यामुळे हे मासे मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या नदीमध्ये मृत मासे पाण्यावर तरंगत असून नदीतील पाण्यात विविध प्रकारचे जिवाणू देखील आढळल्याचे समोर आले आहे.वालदेवीच्या पाण्यावर अनेक प्रकारची पिके घेतली जातात. त्यातच आता लाखो मासे या नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आले आहे. याआधीही काही वर्षांपूर्वी वालदेवी नदीपात्रातील दाढेगाव व पिंपळगाव परिसरात लाखो मासे (Fish) मृतावस्थेत आढळून आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नद्यांचे प्रदूषण माशांच्या आणि अन्य जलचरांच्या जीवावर उठल्याने पर्यावरणप्रेमी (Environmentalist) आणि स्थानिकांमध्ये (Locals) संतापाचे वातावरण पसरले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ मार्च २०२५ – स्वप्नांचा पाठलाग करा

0
भारतीय क्रिकेट संघाने गाजवलेला पराक्रम लोकांच्या कायम स्मरणात राहील. आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकून संघाने 12 वर्षांचा दुष्काळ संपवला. संघाने हा चषक 2013 साली जिंकला...