Saturday, July 27, 2024
Homeनगरनिळवंडेचे पाणी लवकरच मिळणार - थोरात

निळवंडेचे पाणी लवकरच मिळणार – थोरात

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर व अकोले तालुक्यात निळवंडे कालव्यांची कामे मोठ्या प्रमाणात जलदगतीने सुरू आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून निळवंडे धरणाचे पाणी लवकरच मिळणार असून शेतकर्‍यांचे पाण्याचे स्वप्न पूर्ण होईल, असे प्रतिपादन थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी केले.

- Advertisement -

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे आयोजित असंघटीत बांधकाम कामगारांना साहित्य संच प्रदान कार्यक्रमात इंद्रजीत थोरात बोलत होते. प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्या बेबीताई थोरात, आशाताई इल्हे, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, प्रभाकर कांदळकर, नामदेव दिघे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर दिघे, सोपान दिघे, नंदकुमार पिंगळे, बाळासाहेब दिघे, सुनील दिघे, छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे, गणेश दिघे, विकास गुरव, संपत दिघे, काशिनाथ जगताप, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आंबरे, रावसाहेब दिघे, पंढरीनाथ इल्हे, विठ्ठलराव दिघे, नानासाहेब दिघे, लक्ष्मण दिघे, इसाक शेख, भाऊसाहेब दिघे, दादासाहेब दिघे, गणेश बोखारे उपस्थित होते.

श्री. थोरात म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांसाठी विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून असंघटीत बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे. तळेगाव दिघे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. विविध विकास कामे सुरू आहेत. महेंद्र गोडगे पाटील म्हणाले, निळवंडे धरण कालव्यांचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेच निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला मिळवून देणार आहेत. विकास कामेही त्यांच्या प्रयत्नातून सुरू आहेत.

प्रसंगी उपसभापती नवनाथ अरगडे, आशाताई इल्हे, बेबीताई थोरात, रमेश दिघे यांची भाषणे झाली. प्रसंगी इंद्रजीत थोरात तसेच पदाधिकार्‍यांच्या हस्ते असंघटीत बांधकाम कामगारांना साहित्य संच प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी केले. सूत्रसंचालन सचिन दिघे यांनी केले तर गणेश दिघे यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या