येवला | प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत राज्यातील एक कोटी ५७ लाख ‘आनंदाचा शिधा’ संच वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला आनंदाचा शिधा मिळेल, त्यापासून कोणीही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
येवला तालुक्यात १४० स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील, पिवळे, केसरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संचांचे वाटप करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील अंत्योदय योजनेतून ९ हजार ५८६ व प्राधान्य योजनेतून २८ हजार ४१४ अशा साधारण 38 हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होणार आहे, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे आनंदा शिधा वाटपाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. आनंदाचा शिधा संचात एक किलो रवा, एक किलो चना डाळ, एक किलो साखर व एक लिटर खाद्यतेल या चार जिन्नसांचा समावेश आहे. हा संच प्रति शिधापत्रिका ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपयांत वितरित केला जाणार आहे.
येवला तालुक्यात १४० स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून दारिद्र्यरेषेखालील, पिवळे, केसरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा संचांचे वाटप करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील अंत्योदय योजनेतून ९ हजार ५८६ व प्राधान्य योजनेतून २८ हजार ४१४ अशा साधारण ३८ हजार लाभार्थ्यांना या शिधा संचाचा लाभ होणार आहे, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमास पुरवठा विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार निरांजना पराते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, शहराध्यक्ष दिपक लोणारी, मकरंद सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, प्रा.ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.