मुंबई | Mumbai
राज्य सरकारने (State Government) दही हंडीच्या (Dahi Handi) पार्श्वभूमीवर गोविंदांना क्रीडा (sports) प्रकारासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या पाच टक्के आरक्षणामध्ये (Reservation) सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावर अगोदर राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील शिंदे- फडणवीस सरकारला (Shinde- Fadnavis Government) धारेवर धरत टीका केली होती. त्यानंतर आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे…
यावेळी पाटील म्हणाले की, “खेळांच्या सर्व यादीमध्ये अजून एक खेळ जोडला गेला आहे. बाकी काहीही झालेले नाही. त्यामुळे हे आरक्षण नव्याने दिलेले नाही. दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन ते आरक्षणात जोडले आहे. त्यात आरडाओरडा करण्यासारखे काय आहे? असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, आम्ही यात कुठलेही अधिकच आरक्षण दिले नाही. फक्त नवा खेळ या आरक्षणात जोडला गेला आहे. आता कोणी विटी दांडू (Viti Dandu) आरक्षणात जोडण्याची मागणी केली तर तोही जोडू. सगळ्या गोष्टी सोप्या असताना त्या अवघड करून समाजाची दिशाभूल केली जात आहे. कोणी मागणी केली तर मंगळागौर देखील यात जोडू, असे ते म्हणाले.
तसेच एखाद्या निर्णयाचा अभ्यास करण्यापूर्वीच बोलणे सुरू केले जाते. आधीच राज्यात खेळामध्ये आरक्षणाचा (Sports Reservation) कायदा (Law) आहे. खेळामधील ५ टक्के आरक्षण आधीच सगळ्या जातींना आहे, असेही त्यांनी सांगितले.
अजित पवार काय म्हणाले?
गोविंदा पथकांना आरक्षण देण्याविषयी तुम्ही निर्णय घेतला. पण उद्या त्यांच्यातला एखादा काही न शिकलेला किंवा अगदी दहावीही न झालेला असेल आणि त्याने त्या पथकात पारितोषिक मिळवले, तर त्याला कोणती नोकरी देणार तुम्ही? बाकीची मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्यांना काय देणार तुम्ही? असे अजित पवार म्हणाले होते.