Monday, April 14, 2025
Homeमुख्य बातम्याChandrakant Patil : "उद्धव ठाकरेंना सत्तेत यायचं आहे, पण..."; मंत्री चंद्रकांत पाटलांचा...

Chandrakant Patil : “उद्धव ठाकरेंना सत्तेत यायचं आहे, पण…”; मंत्री चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | Mumbai

२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची (BJP and Shivsena) युती तुटल्यापासून सातत्याने दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. युती (Alliance) तुटल्याचे कारण दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर करत आहे. एकप्रकारे शिळ्या कढीला ऊत आणण्याचे काम हे दोन्ही पक्ष करत आहेत. अशातच आता पुन्हा एकदा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

- Advertisement -

यावेळी ते म्हणाले की, “अमित शाह (Amit Shah) यांच्या दौऱ्याच स्वागत करायचे सोडून संजय राऊत (Sanjay Raut) टीका करतात. त्यांना कुणी प्रतिसाद देत नाहीत. अमित शाहांनी स्वत:चं पाचशे पानी पुस्तक तयार केलेले आहे. हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) आहे. त्यांनी संदर्भ गोळा केले आहेत पण ते पुस्तक त्यांचे आहे. येत्या काही दिवसांत ते पुण्यात प्रकाशित करायचे की दिल्लीत इतकाच मुद्दा राहिला आहे. ज्या पुस्तकाचे वाचन केल्यानंतर संजय राऊत यांनाही चक्कर येईल. इतका अभ्यास अमित शाह यांनी केला आहे. अशा अमितभाईंबद्दल केवळ तुम्ही सत्तेत नाही. मात्र, तुम्हाला यायचं आहे पण घेत नाहीत. म्हणून किती दुस्वास करणार?” असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, “संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाकडे लक्ष द्यावे. आगामी महापालिका निवडणुकीत (NMC Election) त्यांच्याकडे उभे करायला देखील लोक राहणार नाही. आता पुण्यातील पाच माजी नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. तसेच मुंबईतील (Mumbai) ९२ पैकी ५७ माजी नगरसेवक शिंदेंसोबत गेले आहेत. त्यामुळे पुणे, नागपूर सोडा पण मुंबईतच शिवसेना ठाकरे गटाला उमेदवार सापडणार नाही”, असा दावा त्यांनी केला.

पुढे ते म्हणाले की, “संजय राऊत जे म्हणतील ते खरे आहे, असं म्हणण्यापेक्षा खोट आहे असेच म्हणता येईल. राज्यातील २३५ आमदारांनी देवेंद्रजींना मुख्यमंत्री केले. सर्वसामान्य व्यक्तिमत्व महाराष्ट्रात (Maharashtra) मुख्यमंत्री आहे. आरक्षण नसतानाही सुविधा देण्याच्या योजना फडणवीस यांनी सुरु केली. दलित, मराठी, ओबीसी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जाऊ शकत नाहीत. परंतु, संजय राऊत यांच्या मनातील हा जातीवाद आहे. तो व्यवहारात येऊ शकणार नाही. राज्यात मराठे मुख्यमंत्री (CM) होते. त्यांनी मराठा समाजास आरक्षण दिले नाही, पण फडणवीसांनी दिले. ते कधी जातीवाद करत नाही”, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : जुन्या वादातून एकाचा धारदार शस्त्राने खून; नाशिक हादरलं

0
इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar पांडवलेणी परिसरात (Pandavleni Area) रहिवासी वसाहतीत जुन्या वादातून एकाची धारदार शस्त्राने वार करून खून (Murder) झाल्याची घटना घडली आहे. रविवारी...