Saturday, July 27, 2024
Homeनाशिकरोजगार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन; म्हणाले...

रोजगार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांचे आवाहन; म्हणाले…

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी रोजगार मेळाव्यांसह (Job Fair) इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. असा नोकरी महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याही जयंतीला आयोजित केला पाहिजे. एक दिवस डीजे लावून कार्यक्रम न करता असा कार्यक्रम दररोज करा, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Minister Chagan Bhujbal) यांनी केले.

- Advertisement -

यावेळी भुजबळ म्हणाले की, अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार महोत्सव होतोय. अजित पवार यांचा दररोज वाढदिवस आला पाहिजे. शिवाय १२ डिसेंबरला पवारसाहेबांच्या वाढदिवसाला काही कार्यक्रम घेता येईल का याचा विचार करावा. त्यावेळी आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत. तसेच शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्याही जयंतीला असे कार्यक्रम घेतल्यास मला आनंदच होईल, असेही भुजबळ यांनी म्हटले.

भीषण अपघात! भरधाव कारची सहा गाड्यांना धडक; तिघांचा मृत्यू, सात गंभीर

ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने तरुणांना रोजगारासह, स्वयंम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री स्वयंम रोजगार योजनेच्या माध्यमातून स्ट्रीट फूड वाहनांचे वाटप करण्यात आले आहे. यापुढील काळात तरुणांना रोजगार मिळण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातील. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या युवक पदाधिकाऱ्यांची कमिटी तयार करून जिल्ह्यातील तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

अमित शाह, जयंत पाटील भेटीच्या चर्चेवर अजितदादांचा मोठा खुलासा, म्हणाले…

माजी खासदार समीर भुजबळ यांचे यशस्वी नियोजन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य नोकरी महोत्सवाचे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी यशस्वी नियोजन केले. गेल्या पंधरा दिवसांपासून चोख पद्धतीने नियोजन करून जिल्हा भरात याबाबत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यंत्रणा राबविली. त्यांच्या या यशस्वी नियोजनामुळे या नोकरी महोत्सवामध्ये सुमारे साडेआठ हजारांहून अधिक तरुणांनी नोंदणी केली तर तीन हजारांहून अधिक तरुणांनी प्रत्येक्षरित्या सहभाग नोंदविला.

नोकरी महोत्सवात ५० हून अधिक कंपन्या संस्थांचा सहभाग

या नोकरी महोत्सवात पुणे आणि नाशिकमधील नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट, फायन्सस, सेवा या क्षेत्रातील जवळपास ५० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी घेऊन नोकऱ्यांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात आल्या. या महोत्सवात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी यासह सर्वच विभागातील पात्रताधारक उमेदवारांनी सहभाग नोंदविला. या नोकरी महोत्सवासाठी जॉब फेअर इंडिया या कंपनीच्या वतीने सहकार्य करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या