Monday, May 27, 2024
HomeनाशिकNashik Yeola News : मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील ६५ जिल्हा परिषद...

Nashik Yeola News : मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील ६५ जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील (Yeola Constituency) ६५ जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने मतदारसंघातील शाळांची दुरस्ती होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुविधा मिळणार आहे…

- Advertisement -

मंत्री भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जिल्हा वार्षिक सर्व साधारण योजनेअंतर्गत शाळेच्या इमारती, वर्ग खोल्या आणि स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी मतदारसंघातील ६५ शाळांना २ कोटी ३० लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये येवला मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळा आहेरवाडीसाठी ५ लक्ष ४० हजार, रामवाडी अंदरसूल शाळेसाठी ३ लक्ष ८० हजार, शंकरवाडी शाळेसाठी २ लक्ष २५ हजार, अंगुलगाव शाळेसाठी ५ लक्ष ४० हजार, दहेगाव शाळेसाठी २ लक्ष, बोंबलेवस्ती शाळेसाठी ३ लक्ष ५० हजार, कानडी शाळेसाठी ३ लक्ष २५ हजार, महालखेडा शाळेसाठी ३ लक्ष ५० हजार, लमाणतांडा, मातुलठाण शाळेसाठी प्रत्येकी २ लक्ष, अंबूमाळीमळा शाळेसाठी २ लक्ष ६२ हजार, तांबडधोंडा शाळेसाठी १ लक्ष ७५ हजार, पाटील वस्ती शाळेसाठी ५ लक्ष १० हजार, पन्हाळसाठे शाळेसाठी २ लक्ष ८९ हजार, पांजरवाडी शाळेसाठी ६ लक्ष १५ हजार, रहाडी शाळेसाठी ४ लक्ष ८५ हजार, नाईकवस्ती शाळेसाठी ३ लक्ष १० हजार, हनुमाननगर सोमठाण जोश शाळेसाठी २ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच शिवाजीनगर तळवाडे शाळेसाठी ३ लक्ष २० हजार, ठाणगाव शाळेसाठी ४ लक्ष ५० हजार, तांदूळवाडी शाळेसाठी ५ लक्ष, वडगाव, पिंप्री, घानामाळी मळा, माळवाडी, हनुमानवाडी मुखेड, मानोरी बु. आदिवासी वस्ती सत्तेगाव, वाघवस्ती राजापूर शाळेसाठी प्रत्येकी २ लक्ष, सोमाशेवस्ती, नगरसूल, आडगाव रेपाळ, वळदगाव शाळेसाठी ३ लक्ष, बऱ्हेमळा, सोनवणे वस्ती, महादेववाडी धामणगाव, कातोरेवस्ती, शेवगे, पुरणगाव, आडवाट, एरंडगाव बु., देवदरी, हवालदार वस्ती शाळेसाठी प्रत्येकी २ लक्ष ५० हजार, येवला स्टेशन, माळवाडी देशमाने, दत्तवाडी मुखेड, सत्यगाव, जळगाव, ममदापूर, अनकाई बारी शाळेसाठी प्रत्येकी ४ लक्ष, नागडे शाळेसाठी ६ लक्ष, खिर्डीसाठे शाळेसाठी ८ लक्ष, एरंडगाव खु.शाळेसाठी ३ लक्ष ७० हजार निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) टाकळी विंचूर शाळेसाठी ४ लक्ष ६९ हजार, विंचूर शाळेसाठी ४ लक्ष ५० हजार, वेळापूर, बोकडदरा, विष्णूनगर, विठ्ठलवाडी  शाळेसाठी प्रत्येकी ६ लक्ष, हनुमाननगर, विंचूर माळी शाळेसाठी प्रत्येकी ३ लक्ष, उर्दू शाळा विंचूरसाठी ४ लक्ष ५० हजार, धरणगाव वीर शाळेसाठी ४ लक्ष ३५ हजार तर म-हळगोई शाळेसाठी ५ लक्ष ८० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या