Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ 'अ‍ॅक्शन मोड'वर; ओबीसी नेत्यांची बोलावली तातडीने...

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ ‘अ‍ॅक्शन मोड’वर; ओबीसी नेत्यांची बोलावली तातडीने बैठक, काय निर्णय घेणार?

मुंबई | Mumbai

ओबीसीतून (OBC) मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आमरण उपोषण सुरु आहे. आज (रविवारी) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, लाखो मराठा आंदोलक मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. दुसरीकडे जरांगेंच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच काही जिल्ह्यांत सांखळी उपोषण देखील सुरु केले आहे. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींसाठी मैदानात उतरले आहेत.

- Advertisement -

मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांची उद्या (दि.०१ सप्टेंबर) रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी (Meeting) ओबीसी नेत्यांनी मुंबईत यावे आणि बैठकीत सहभागी व्हावे, असा संदेश भुजबळ यांनी दिला आहे. त्यामुळे आता ओबीसी नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते? या बैठकीतून नेमकी काय भूमिका घेतली जाते? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Reservation) देऊ नये, अशीच भूमिका सध्यातरी सर्व ओबीसी नेत्यांची आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या या बैठकीत ओबीसी नेते आंदोलनाची हाक देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले. तसेच मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊन आंदोलन सुरु केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे देखील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आता उद्या भुजबळांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत ओबीसींचा काय निर्णय होतो? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

उद्या ओबीसी नेत्यांची पत्रकार परिषद

भुजबळ यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ओबीसी समाजाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाणार असून, विशेषतः हैदराबाद गॅझेट, सातारा आणि औंध गॅझेट यासंदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा संदर्भ देत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...