Monday, November 25, 2024
HomeनाशिकNashik News : पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सदैव कटिबध्द -...

Nashik News : पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी सदैव कटिबध्द – मंत्री छगन भुजबळ

मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याद्वारे आलेल्या पाण्याचे जलपूजन संपन्न

नाशिक | Nashik

मांजरपाडा प्रकल्पाचे (Manjarpada Project) पाणी आज येवल्यातील (Yeola) डोंगरगाव येथील साठवण तलावात प्रवाहित झाले आहे. येवलेवासियांना दिलेल्या शब्दाची स्वप्नपूर्ती झाल्याचा मनस्वी आंनद असून यापुढील काळातही पाण्यापासून (Water) कोणीही वंचित राहणार नाही तसेच मांजरपाडा प्रकल्प केवळ पूर पाण्यावर थांबणार नाही तर पार-गोदावरी उपसा जोड योजना क्र.३ व ४ च्या माध्यमातून पार खो-यातील पश्चिमेकडे वाहून जाणारे ५०० मीटर पर्यंतच्या लेवलचे ५ टी.एम.सी. पाणी लिफ्ट करुन आपण मांजरपाडामध्ये आणणार आहोत. हे पाणी पूणेगांव दरसवाडी मार्गे येवल्याला आणणार असून येवल्याची तहान भागून आपण वैजापूर, संभाजीनगरला सुद्धा पाणी देणार आहोत असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

- Advertisement -

हे देखील वाचा : मंत्री भुजबळांची नांदूर मध्यमेश्वरच्या सरपंच, उपसरपंचाची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

आज मांजरपाडा प्रकल्पातील पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याद्वारे साठवण तलावात आलेल्या पाण्याचे जलपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, माजी खासदार समीर भुजबळ, पंकज भुजबळ, अॅड. रविंद्र पगार, अंबादास बनकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सविता पवार,राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, अरुण थोरात, प्रेरणा बलकवडे, वसंतराव पवार, साहेबराव मढवई, भाऊसाहेब भवर, ज्ञानेश्वर शेवाळे, डी. के. जगताप, हुसेन शेख, राजश्री पहिलवान, भाऊसाहेब बोचरे, यांच्यासह आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा : त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! नाशिक-डहाणू नवीन मार्गाच्या अंतिम लोकेशन सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, या योजनेचा डीपीआर सुद्धा तयार झालेला आहे. मेरीच्या SLTAC कमिटीच्या मान्यतेनंतर हा डीपीआर (DPR) शासनाकडे मंजुरीसाठी येणार आहे. आगामी काळात आपण दरसवाडी धरणाची क्षमता सुद्धा वाढवणार आहोत. पुणेगांवमध्ये आणखीनही कुठून पाणी शकतो याबाबत जलसंपदा विभागाचे सचिव आणि नरहरी झिरवाळांसोबत चर्चा सुद्धा झाली आहे. मांजरपाडा-गुगुळ या प्रवाही वळण योजना राबवून या वळण योजनांचे पाणी पुणेगावमध्ये आणण्यांसाठी सर्वेक्षण करुन डीपीआर तयार करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.

 हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविण्यासाठी आग्रही

पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, दुष्काळाच्या (Drought) छायेत असलेल्या येवल्याला कुठल्याही परिस्थिती पाणी आणण्याचे असा निश्चय आपण केला होता. येवलेकराना पाणी आणण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आपण चंग बांधला होता. आज अनेक अडचणींवर मात करत डोंगरगावमध्ये पाणी दाखल झाले असून दिलेला शब्द पूर्ण केला आहे. यापुढील काळातही अधिक आपले हे काम सुरू राहील.येवला तालुक्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याचे पाणी लवकरच उपलब्ध होईल. यासाठी अनेक योजना प्रगतीपथावर असून लवकरच या योजना पूर्ण होऊन पाणी उपलब्ध होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच येवला मतदारसंघात (Yeola Constituency) आपण हजारो कोटी रुपयांची विकास कामे केली आहे. आता पिंपळस ते येवला रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी ५६० कोटी रुपये मंजूर होऊन लवकरच काम सुरू होईल. राजापूरसह ४१ गाव पाणी पुरवठा योजनेसाठी १८८ कोटी, धुळगावसह १६ गावे पाणी पुरवठा योजनेसाठी ७३ कोटी, येवला शहरात ८८ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे भुजबळांनी सांगितले.

 हे देखील वाचा : Nashik Crime News : निशाचा मृत्यू संशयास्पद नव्हे तर खूनच

मंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, २००६ साली झालेला कालवा २०१९ पर्यंत पडीक असल्याने अनेक अडचणी होत्या, कालव्याची दुरवस्था झालेली होती. यासंदर्भात तज्ज्ञ मंडळी व प्रशासनाची बैठक घेतल्यानंतर कालव्याचे नव्याने विस्तारीकरण व अस्तरीकरण करण्याची गरज समोर आली. दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काँक्रीटीकरण व अस्तरीकरणासाठी २४२ कोटींचा निधी मंजूर करून घेतला. या कामाला तात्काळ सुरुवात करण्यात आली. काम वेगाने होण्यासाठी कालव्यावर प्रत्येक २० किमी अंतरावर आधुनिक यंत्रांद्वारे हे काम सुरू होते. या अथक प्रयत्नानंतर दीड वर्षांची मुदत असलेले हे काम अवघ्या ६ महिन्यांत जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले. मांजरपाडा पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरूवात झाली आहे, बोगद्याद्वारे पुणेगाव धरणात (Punegaon Dam) आवक सुरू झाली. पुनेगाव व दरसवाडी धरण भरून पाणी येवल्याच्या हद्दीत दाखल झाले, असे त्यांनी म्हटले.

 हे देखील वाचा :  यंदा गणेशोत्सवात ‘लेव्हल खाली’ ठेऊनच डीजेचा दणदणाट; पोलिस आयुक्तांनी दिल्या ‘या’ सुचना

तसेच येवला तालुक्यातील (Yeola Taluka) पूर्व भागासोबतच चांदवड तालुक्याला देखील या पाण्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. येवलेकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी भावूक होत व्यक्त केल्या. येवलेकरांनी माझ्यावर दाखवलेल्या विशेष प्रेमामुळे या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे करू शकलो. यापुढेही विकासाची ही कामे अविरत सुरु राहतील असा विश्वास यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करत इतक्या वर्ष माय माऊलीचे अश्रू पुसण्यासाठी आजचा दिवस आहे. यात कुठलाही राजकारण नाही. या आनंदाच्या क्षणात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याला ‘भुजबळ कालवा’ नाव द्या, येवलेकरांची मागणी

मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव-दरसवाडी डोंगरगाव कालव्याच्या माध्यमांतून डोंगरगाव साठवण तलावात पाणी पोहचले. या पाण्यामुळे तीन पिढ्यांचे स्वप्न साकार झाले आहे. त्यामुळे या कालव्याला ‘भुजबळ कालवा’ नाव द्यावे अशी घोषणा पाणी आंदोलक डॉ.मोहन शेलार यांनी केले. या घोषणेला येवलेकरांनी साथ देत ‘भुजबळ कालवा’ अशी घोषणाबाजी केली.

मंत्री छगन भुजबळ यांचे गावोगावी जल्लोषात स्वागत

मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याद्वारे डोंगरगाव साठवण तलावात प्रवाहित झाले आहे. आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या पाण्याचे जलपूजन करण्यात आले. दरम्यान येवला येथून डोंगरगावच्या दिशेने जात असताना ढोलताशा, डीजे वाजवत, फुलांची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोषात गावोगावी जल्लोषात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नागडे, धामणगाव, सायगाव फाटा, पांजरवाडी, गारखेडा, कौटखेडा, तळवाडे यासह विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.सायगाव फाट्यापासून मोटरसायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या