Wednesday, January 7, 2026
Homeमुख्य बातम्याLadki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे निधीला उशीर होतोय; मंत्री भरणेंचे...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे निधीला उशीर होतोय; मंत्री भरणेंचे विधान; भुजबळांचाही सुरात सूर, म्हणाले “यात लपवण्यासारखे…”

नाशिक | Nashik

महायुती सरकारला (Mahayuti Government) पुन्हा सत्तेत आणण्यासाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात राज्य सरकारकडून (State Government) महिन्याला १५०० रुपये जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या १२ हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र, या योजनेसाठी सरकारकडे पैसेच नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळविण्यात आला होता. यावरून महायुतीमध्ये मोठे घमासान देखील झाले होते. त्यानंतर आता महायुती सरकारमधील मंत्री दत्तात्रय भरणे (Minister Dattatreya Bharane) यांनी ‘लाडकी बहीण योजनेमुळे विकासकामांसाठी निधी यायला उशीर होत’, असल्याचे म्हटले आहे. यावर राज्य सरकारमधील दुसरे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.

YouTube video player

यावेळी भुजबळ म्हणाले की, “यात लपवण्यासारखे काही नाही, स्वाभाविक आहे. घरी अचानक एक मोठा खर्च निघाला तर काय स्थिती होते. लाडकी बहीण योजनेसाठी ४५००० हजार कोटी बाजूला काढायचे आहेत. त्यामुळे इतर गोष्टींना ताण सहन करावा लागेल. त्यामुळे शंभर टक्के मलाही वाटते आणि कोणालाही वाटणारच” असे त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले की, “सरकारकडे लाडक्या बहि‍णींसाठी शिल्लक निधी (Funds) पडलेला नव्हता. जोपर्यंत नीट घडी बसत नाही तोपर्यंत हे होणार आहे. सरकार पुन्हा पूर्ववत घडी कशी बसणार यासाठी प्रयत्न करत आहे. लाडकी बहीण, शिवभोजन थाळी याच्या पैशांना देखील उशीर होत आहे. पैसे कुठेही जाणार नाही सर्वांना ते पैसे मिळणार आहेत. पहिले कशाला प्राधान्य द्यायचे हे सरकारने ठरवायचे असते,” असेही छगन भुजबळ यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील दत्तात्रय भरणे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी दत्तात्रय भरणे यांना विचारतो की त्यांच्याकडे कुठली बातमी कळाली, शेवटी ते माझे सहकारी आहेत. मंत्री महोदय आहेत, त्यांना विचारुन क्लिअर करतो, कुठल्या अपेक्षेने, कुठल्या हेतूने ते बोलले आहेत,” असे अजित पवारांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...