Saturday, November 23, 2024
Homeनाशिकमंत्री भुजबळांची नांदूर मध्यमेश्वरच्या सरपंच, उपसरपंचाची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

मंत्री भुजबळांची नांदूर मध्यमेश्वरच्या सरपंच, उपसरपंचाची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार

नेमकं प्रकरण काय?

नाशिक | Nashik

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून नांदूरमध्यमेश्वर ग्रामपंचायत (Nandur Madhyameshwar Gram Panchyat) तसेच सरपंच, उपसरपंच माजी जिल्हा परिषद नाशिक व जिल्हा परिषद प्रशासन नाशिक यांच्या विरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : निशाचा मृत्यू संशयास्पद नव्हे तर खूनच

नांदूर मध्यमेश्वर ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद (Zilla Parishad) बांधकाम विभाग एकात्मिक बालविकास विभाग यांच्या योजनेअंतर्गत २९ जुलै रोजी अंगणवाडी इमारतीचा तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विधानसभा मतदारसंघाचा आमदार असून देखील बोलवण्यात आले नाही.

हे देखील वाचा :  त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! नाशिक-डहाणू नवीन मार्गाच्या अंतिम लोकेशन सर्वेक्षणास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

तसेच सदर सोहळ्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, सुरेखा नरेंद्र दराडे तसेच ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कार्यक्रमाला न बोलवून जाणीवपूर्वक अवमान केल्याची तक्रार भुजबळ यांनी पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षाकडे (Legislative Assembly Speaker) केली आहे.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : अजित पवारांची राष्ट्रवादी विधानसभेच्या ‘इतक्या’ जागा लढविण्यासाठी आग्रही

भुजबळांनी पत्रात नेमकं काय म्हटले आहे?

मी महाराष्ट्र विधानसभा नियम २७३ अन्वये सरपंच सौ. गायत्री दिपक इकडे, उपसरपंच सौ. हिराबाई दामोदर खुरासणे, ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर व जबाबदार जिल्हा परिषद प्रशासन तसेच माजी जि.प.सदस्य श्रीमती अमृता वसंतराव पवार, श्रीमती सुरेखा नरेंद्र दराडे यांचे विरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना देत आहे. दि. २९ जुलै २०२४ रोजी ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर ता.निफाड येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग व एकात्मिक बाल विकास योजने अंतर्गत अंगणवाडी इमारतीचा तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

हे देखील वाचा : Bail Pola 2024 : पोळ्याचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत शेतकऱ्यांची गर्दी

या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुरेखा नरेंद्र दराडे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नांदूरमध्यमेश्वर ता.निफाड जि.नाशिक, (बांधकाम खर्च रु.६० लक्ष) या इमारतीचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. तसेच याच दिवशी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती अमृता वसंतराव पवार यांच्या हस्ते एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडी इमारतीचे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. मी या क्षेत्राचा विधानसभा सदस्य असून या कार्यक्रमासाठी मला जिल्हा परिषद, नाशिक प्रशासनाने किंवा ग्रामपंचायतीने कोणतीही सूचना दिलेली नाही वा मला आमंत्रित केलेले नाही. या बाबतीत मी जिल्हा परिषद, नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) श्री. प्रताप पाटील, गट विकास अधिकारी पंचायत समिती निफाड श्री. महेश पाटील यांना सूचना देऊन विचारणा केली. परंतु, वरीलपैकी कोणीही सदर प्रकरणी हस्तक्षेप करून चूक सुधारणा करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही.

हे देखील वाचा : Nashik Crime News : पित्याकडून गतिमंद मुलीवर अत्याचार

तसेच श्रीमती अमृता पवार या माजी जिल्हा परिषद सदस्य असून कोनशिलेवर त्यांचा उल्लेख जिल्हा परिषद, सदस्य, नाशिक असा करण्यात आला आहे. ही बाब देखील नियमांस अनुसरून नाही. या संदर्भात मी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांच्याकडे देखील तक्रार दाखल केलेली आहे. सरपंच सौ. गायत्री दिपक इकडे, उपसरपंच सौ. हिराबाई दामोदर खुरासणे, ग्रामपंचायत नांदूरमध्यमेश्वर, माजी जि.प. सदस्य श्रीमती अमृता वसंतराव पवार, श्रीमती सुरेखा नरेंद्र दराडे, जिल्हा परिषद, नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) श्रीमती वर्षा फडोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सुधाकर मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) श्री. प्रताप पाटील, गट विकास अधिकारी पंचायत समिती निफाड श्री. महेश पाटील यांनी शासकीय निधीतून बांधकाम केलेल्या शासकीय कार्यालयाच्या इमारतींच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यास स्थानिक विधानसभा सदस्यास डावलून विधानमंडळ सदस्यांचा पर्यायाने विधानसभेसारख्या सार्वभौम व सर्वोच्च संस्थेचा जाणीवपूर्वक अवमान व विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी विशेषाधिकार भंग समितीकडे सुपूर्द करण्यात यावे, अशी आपणांस विनंती आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या